आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे वाघळीच्या कु. रेखा धनगर हिचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वप्न पूर्ण
चाळीसगाव - वाघळी ता.चाळीसगाव येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील कु.रेखा धनगर हिचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने एका ट्रॅक्टर चालकाच्या मुलीने घेतलेल्या हॉंगकॉंग भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे
वाघळी येथे ट्रॅक्टर चालक असलेले पुना धनगर यांची मुलगी कु.रेखा धनगर हिला हॉंगकॉंग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल स्पर्धेत आर्थिक परिस्थिती मुळे सहभागी हो व शक्य होणार नव्हते, ही बाब आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कळताच त्यांनी कु.रेखा धनगर हिचे पालकत्व स्विकारत तिच्या स्पर्धेचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली.
कु.रेखा चे जालिंधर व हरियाणा येथे जवळपास १ महिना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दि.१८ मे रोजी ती भारतीय महिला बेसबॉल संघासोबत हॉंगकॉंग रवाना झाली.
पहिले दोन सामने जिंकत विजयी घोडदौड...

0 टिप्पण्या