रयत सेनेच्या आंदोलनानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला न्याय

 

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रयत सेनेचे तब्बल २ तास तहसील कार्यालय आवारात केले ठिय्या आंदोलन



चाळीसगाव - कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केल्यानंतरही कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ही बाब रयत सेनेच्या लक्षात आणून दिल्यानंतर शेतकरी संघटना व रयत सेनेने आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले होते .मात्र सातबारा उताऱ्यावर कांद्याची नोंद असताना ही ७ /१२ उतारा प्रमाणित करण्यास कृषी विभागाने नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्यानंतर दि २८ एप्रिल २०२३ रोजी रोजी पुन्हा चाळीसगाव तहसील कार्यालय आवारात चाळीसगाव कृषी विभागाच्या विरोधात रयत सेनेने ठिय्या आंदोलन सुरू केले



आंदोलनाची दखल घेत तहसीलदार चाळीसगाव यांनी मध्यस्थी करून कृषी विभागाशी संपर्क साधला असता कृषी विभागाचे श्री साठे यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सही शिक्के मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले ठिय्या आंदोलन नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री लोधे यांच्या उपस्थितीत मागणी मान्य झाल्याने थांबविण्यात आले .रयत सेनेच्या आंदोलनाला यश आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३५० अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी रयत सेनेचे आभार मानले आहे. 

     कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर करून ७ /१२ उताऱ्यावर लेट खरीप कांद्याची नोंद अत्यावश्यक केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये या जाचक अटीमुळे कमालीची नाराजी होती. शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ व्हावा म्हणून दि १९ एप्रिल २०२३ रोजी रयत सेनेने जिल्हाभर निवेदने देवून आंदोलन करत कांद्याची नोंद शिथिल करण्याची मागणी केल्यानंतर शासनाने याची दखल घेऊन सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने परिपत्रक काढून तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची संयुक्त समिती जिल्हाधिकारी यांनी बनून कांदा लागवडीचे क्षेत्र तपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या सही शिक्के करून ७ /१२ उतारा प्रमाणित करण्याचे आदेश दिले असताना चाळीसगाव कृषी अधिकारी यांनी ७/१२ उताऱ्यावर कृषी सहाय्यक यांचे सही शिक्के मारण्याचे कृषी अधिकार्‍याने नाकारले होते त्यामुळे गेल्या ७ दिवसापासून तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय येथे जाऊन ७ /१२ उतारा प्रमाणित करण्यासाठी शेतकरी चकरा मारत होते मात्र त्यांना प्रशासन दाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांना भेटून कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात पुन्हा रयत सेनेला आंदोलनाचा पवित्रा घेत चाळीसगाव तहसील कार्यालय आवारात दि २८ रोजी जवळपास २ तास रयत सेना व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मध्यस्थीने व तालुका कृषी अधिकारी श्री साठे यांच्या आश्वासनानंतर निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लोधे यांच्या उपस्थितीत मागणी मान्य झाल्याने रयत सेनेचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर लागलेच कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सही शिक्के दिले. केवळ कृषी विभागाच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार होते मात्र वेळेतच रयत सेनेने आंदोलन करून शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने यावेळी शेतकऱ्याने रयत सेनेचे आभार मानले आहे



आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष विजय (पप्पू) पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे,स्वप्नील गायकवाड, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, तालुका उपाध्यक्ष भरत नवले,विजय चौधरी, प्रकाश जगताप यांच्यासह शेतकरी किरण पवार,बाळू शिंदे,योगेश पवार,दत्तु पवार,दिनेश पवार,चांगदेव चव्हाण,बाळु आगोणे,तुकाराम आंगोणे,लक्ष्मण राठोड, जावेद शेख, केसर राठोड सुभाष राठोड ,वनिता राठोड, गोकुळ राठोड ,रखमाजी बर्वे, सुदाम चव्हाण, शरद दौंड ,हरी आवारे, योगेश पवार ,अरुण पवार ,भाऊराव चव्हाण, विमल जाधव, मेघराज चव्हाण, भाऊसाहेब जाणे, सुकलाल साधू, गुलाब जाधव, वाल्मीक सांगळे, सागर पवार ,राजेंद्र पवार, छोटू राठोड, अनिल देवा, गणेश पवार, रामू चव्हाण, यशवंत जाधव ,अशोक जाधव, नेमीचंद राठोड, तुळशीराम राठोड, लक्ष्मण महाले ,अक्षय जाणे, भावलाल राठोड, सुशील चव्हाण ,वाडीलाल राठोड, मच्छिंद्र राठोड ,बाजीराव राठोड, सुरेश राठोड, वनिता राठोड, शहिदास राठोड, योगेश राठोड ,रुमदेव राठोड, सज्जन राठोड ,रवींद्र राठोड, छगन राठोड ,रामेश्वर राठोड, पंडित राठोड, रामभाऊ चव्हाण , मोहन राठोड ,मगन राठोड, मांगीलाल राठोड,समीर शेख यांच्यासह घोडेगाव,राजदेहरे,शिवापूर,शिंदी,चंडीकावाडी,वलठाण,खराडी,करजगाव येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या