महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस , लाइनमनचा मुजोरपणा

 लाईनमनच्या त्रासापोटी शेतकरी कंटाळला 



उभे पिक चालले वाळत


प्रतिनिधी : विलास साखरकर 8208260998


यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डफरे यांनी शेतात ज्वारी व मुक्या जनावरासाठी कड्याळू हे पिक लावले आहे. काल दिनांक चौदा रोजी शेतकरी ज्ञानेश्वर डफरे हे आपल्या शेतात ज्वारी व कड्याळू या पिकासाठी पाणी ओलीत करन्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या शताच्या मध्यभागी जिवंत विद्युत तार हि खाली पडून दिसून आली त्यामुळे शेतकरी हा बाल बाल बचावला या गोष्टीची माहिती शेतकऱ्याने सबंधित भोंगाडे लाईनमन यांना दिली असता त्या कामचुकार लाईनमनने शेतकऱ्याला उलट भाषेत उत्तर दिले माझ्याकडे वेळ नाही आहे तुम्ही एखादी खाजगी वायरमन पकडून त्या जिवंत विद्युत तार जोडून घेन्यास सांगितले. शेतात जिवंत विद्युत तार पडून असल्याने मोठा अनर्थ घडू शकतो व या गोष्टिला सदर लाईनमन जबाबदार राहील असे शेतकऱ्यांने बोलून दाखवले. सदर जिवंत विद्युत तार लवकर जोडून द्यावी नाही तर माझ्या शेतातील ज्वारी व कड्याळू हे पिक हाती येनार नाही त्यामुळे माझे खुप नुकसान होईल या गोष्टीची राळेगाव महावितरण कंपनीने दखल घ्यावी व असा कामचुकार लाईनमन बदलून देण्यात यावा अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या