'उमरा' ग्रा.पं. अंतर्गत 'उमरा ते फुलमळा तांडा' रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे (खराब काम) झाले असुन त्या कामाची चौकशी



'उमरा' ग्रा.पं. अंतर्गत 'उमरा ते फुलमळा तांडा' रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम  अत्यंत निकृष्ट दर्जाचे (खराब काम) झाले असुन त्या कामाची चौकशी करणे बाबत.

सदर 'उमरा ते फुलमळा तांडा' हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड.. (योजना : आदरणीय आमदार साहेबांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत) मजबुतीकरणासाठी मंजूर झाला होता. परंतु "गुत्तेदाराने व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी" संगनमताने सदरील मजबुतीकरण रस्ता बनवताना योग्य ती काळजी न घेता, हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला आहे. जसे की, फक्त मातीयुक्त व अल्प प्रमाणात मुरुम, गिट्टी आणि मजबुतीकरण करतांना पूर्णपणे पाण्याचा वापर केला नसल्याने, आताचं रस्त्याची जागोजागी  दुरवस्था होतं आहे, आणि व्यवस्थितपणे मजबुतीकरण न झाल्याने, व तसेच यापैकी रस्त्यावर कशाचाच योग्य त्या प्रमाणामध्ये वापर केला नसल्यामुळे, पावसाळ्यात सदरील रस्ता पुर्णपणे उखडून जाण्याची शक्यता आहे, अगोदर जो खडकाळ रस्ता होता तो तरी पावसाळ्यात वावरण्यासाठी योग्य होता, उलट या अर्धवट रस्त्यामुळे पुढे जास्त समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.


  वास्तविक पाहता हा रस्ता पक्का मजबुतीकरणासाठी मंजूर होता, परंतु गुत्तेदाराने व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून सदरील रस्त्यावर अल्प प्रमाणात मुरुम, गिट्टी, पाणी, आणि साईट भरम व अर्धवट नाली काढल्यामुळे रस्ता अयोग्य दर्जाचा आणि धोकादायक झालेला आहे.


  सद्यःस्थितीत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही 'फुलमळा तांड्याला' होईना मजबूत रस्ता, या अशा घातक रस्त्यावरुन आम्हा नागरिकांचा जिवघेण्या प्रवास रस्ता‌.. आम्हा नागरिकांना या खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात इत्यादी त्रास सहन करावे लागत आहेत. जसे की, जर एखादा व्यक्ती गंभीर आजारी असला तर त्याला दवाखान्यात नेईपर्यंत काहीही अनुसुचित प्रकार घडू शकतो. त्याचबरोबर शाळकरी मुलं, गर्भवती महिलांसाठी, व तसेच आजच्या या धावपळीच्या जीवनात वावरताना दळणवळण करण्यासाठी, अशाप्रकारे इत्यादी समस्या उद्भवत आहेत.


  सदरील रस्ता हा आपल्या जि.प. नांदेड अंतर्गत बांधकाम विभागाकडून करण्यात आलेला असुन, अत्यंत खराब आणि निकृष्ट दर्जाचा मजबुतीकरण रस्ता केलेला आहे, सदरील काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातुरमातुर काम उरकले आहे यामुळे आम्हा नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे.


  तरी मा. श्रीमान. साहेबांना कळकळीची नम्र विनंती आहे की, आपण सदरील प्रकरणी 'जातीने' लक्ष देऊन मौजे 'उमरा' ग्रा.पं. अंतर्गत 'उमरा ते फुलमळा तांडा' येथे झालेल्या मजबुतीकरण रस्त्याची काळजीपूर्वक चौकशी करुन दोषी अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करुन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा ही कळकळीची नम्र विनंती, आणि आम्हा ग्रामस्थ नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा अशी आशा आणि अपेक्षा आहेत.


प्रति‌लिपी,

१) मा. जिल्हाधिकारी साहेब, कार्यालय - नांदेड.

२) मा. कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग - नांदेड.

३) मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय - लोहा.

४) मा. गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती - लोहा..

५) मा. ग्रामसेवक / सरपंच साहेब, ग्रा.पं. कार्यालय - उमरा.




१) सतीश मारोती राठोड (उमरेकर) सदस्य - 'उमरा' ग्रा.पं.

२) माजी सरपंच - रामराव राठोड

३) रावसाहेब राठोड

४) राजु रेवा राठोड

५) संतोष घमु जाधव

६) बबन जाधव

७) विजय रामराव राठोड

८) गोविंद चव्हाण

९) रामा राठोड

१०) दिगांबर राठोड

११) दशरथ राठोड 

१२) सुभाष राठोड

१३) मोहन राठोड

१४) संजय राठोड

१५) विजय रामा राठोड

१६) विजय विनायक पवार

१७) विकास बालाजी राठोड

१८) विकास राजु राठोड

१९) गोरख राठोड

२०) बालाजी राठोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या