सुमारे साडे नऊ कोटींचा निधी मंजुर :
12 किलोमीटर रस्त्यांची दुरावस्था होणार दुर
-----------------------------------
जळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था असलेला जळगाव ते चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.753 रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर होता. याबाबत खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे सात्यत्याने येथून प्रवास करणारे प्रवाशांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. आज अखेर खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून या महामार्गावरील सुमारे 12 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी विस लाखांचा निधी मंजूर झाल्याने या रस्त्याचा वनवास संपला आहे.*या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातुन तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. लागलीच या महामार्गाची दुरुस्तीला प्रारंभ होणार असून प्रवाश्यांचे होणारे हाल थांबून अपघात कमी होवून वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नवी दिल्ली येथून दिली आहे.
0 टिप्पण्या