राळेगाव तालुका प्रतिनिधि : विलास साखरकर (8208260998) राळेगाव तालुक्यातील 16/1/2023 कळमनेर येथे . शेतात जागलीला असलेल्या 60 वर्षीय अशोक धनंजय अक्कलवार या शेतकऱ्याचा सकाळी 8:00 वाजता खून झाला आज सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली..... राळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक धनंजय हा शांतीनगर राहणार राळेगाव येथील रहिवासी असून कळमनेर शिवारात त्याची शेत आहे शेत शिवारात बंड्यात तो नेहमी झोपत असतो आज सकाळी त्याचा मुलगा समीर शेताकडे जाऊन दूध आणण्याकरता गेले असता त्याचे वडील खाटेवर मृत अवस्थेत आढळले चेहऱ्यावर डोक्यावर दगडी वाळवंटाचा मार लागून चेहरा रक्ताने माखला होता झाला..... अशोक अक्कलवार याचे कळमनेर शेत शिवारात शेत असून तो नेहमी जागली करायला जायचा घटनेची माहिती मुलगा समीर याने राळेगाव पोलीस स्टेशनला दिली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास राळेगाव पोलीस करीत असून आपल्या वडिलांच्या कुठेतरी घातपात केला अशी शंका व्यक्त केल्या जात आहे..
0 टिप्पण्या