पालघर जिल्हा.गृप ग्रामपंचायत विवळवेढे (महालक्ष्मी)
मुक्काम सोनाळे कोदेपाडा पोस्ट चारोटी तालुका डहाणू जि.पालघर येथील आदिवासी बांधवांचा जीवघेणा धोकादायक लाकडी पुलावरून प्रवास...
प्रतिनिधि : हेमंत घाटाळ
आज आपण अमृतमहोत्सवर्षी पदार्पण करीत असतांना आज ही आपल्या पालघर जिल्ह्य़ातील आदिवासी पाड्यात आदिवासी बांधवांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहाव लागत आहेत.
सोनाळे कोदेपाडा येथे जाण्यासाठी सुर्या उजवा कालवा (नहर पाट) ओलांडून जीव धोक्यात घालून लाकडी पुलावरून (खजूरी चे झाड,माड व अन्य झाडांच्या लाकडी तोडकी, मोडकी फळी टाकून येथून प्रवास करत आहेत, हा प्रवास खुपच धोकादायक आहे.जर तोल गेला तर चक्क ७\८ फुट खोल कालव्यात पाटाच्या वाहत्या पाण्यात पडून वाहून जाऊ शकतात,सोनाळे कोदेपाडा येथे १५ ते २० कुटुंब राहत आहेत. अनेक आदिवासी बांधवांची शेती या भागात आहे,त्यामुळे नेहमीच शेतीच्या कामानिमित्त ये..जा..करावी लागत आहेत. त्याचबरोबर रोजगार निमित्त, बाजारात, रुग्णालयात व शालेय शिक्षण विद्यार्थी (लहान) मुले व येथील नागरिकांना याच लाकडी पुलावरून प्रवास करावा लागत आहे,येथील आदिवासी बांधवांच्या जीवनावर खेळून आपले जीवन जगत आहेत.
या साठी येथील आदिवासी बांधवांनी स्वत: खजूरी व अन्य झाड व लाकडी फळ्या कालव्यात पाटात टाकून प्रवास करत आहेत. गरोदर महिला पेशंट असेल तर डोली मध्ये घेऊन जीवघेणा प्रवास करत आहेत
जर ह्या लाकडी पुलावरून प्रवास नाही केला तर १ ते २ किलोमीटर चा वळसा घालून चालत जावे लागत आहेत. त्यामुळेच येथील आदिवासी बांधव या लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत .उंचीवर असणाऱ्या लहान पुलावरून चढून खाली उतार असल्याने उडी मारून जावे लागत असल्याने लहान मुले,वृद्ध, महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी येथील बांधवांचे खुपच हाल होत आहेत,म्हणून येथील नागरिकांनी या ठिकाणी लोखंडी ब्रीज (साकव) बांधून मिळावा यासाठी गृप ग्रामपंचायत विवळवेढे सरपंच, आमदार, खासदार साहेब यांस कडे मागणी केली होती,पण अनेक वर्षांपासून ही मागणी मान्य झालेली नाही अशी येथील ग्रामस्थांनी दिली.
आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष व भारतीय अस्मिता पार्टी (BAP) पालघर जिल्हाध्यक्ष श्री.विलास लक्ष्मण वांगड यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब व पाटबंधारे विभाग यांना निवेदनात म्हटले की पालघर जिल्हा सोनाळे कोदेपाडा पोस्ट चारोटी तालुका डहाणू येथील आदिवासी बांधवांस या लाकडी पुलावरून जीव धोक्यात प्रवास. करावा लागतो.
सोनावणे कोदेपाडा येथील शाळेतील मुले,महिला व वृद्ध महिला गर्भवती महिला, आजारी व्यक्तीला, यांच पुलावरून जीव धोक्यात घालून पुलावरून ये जा करावे लागते आहे. सदर 11 ते 20 आदिवासी कुटुंब असून या गावात जर मयत किंवा डिलीवरी पेशंट आणि लहान विद्यार्थी असे अनेक प्रश्न या संदर्भात अनेक वेळा ग्रामस्थांनी पाटबंदरे ,सा.बा .विभाग व लोक प्रतिनिधी कडे विनंती करून कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही.मात्र ग्रामस्थांना न्याय मिळेल का ?अशी खंत व्यक्त केली. सर्व सामान्य ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्ते विलास वांगड(BAP) यांनी नाराजी व्यक्त केली.मात्र येथील जिल्हाप्रशासनाचे लक्ष केंद्रित केले. आहे.
0 टिप्पण्या