ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारी ऑनलाइन ग्रेड चित्रकला परीक्षा अखेर रद्द.

 ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारी ऑनलाइन ग्रेड चित्रकला परीक्षा अखेर रद्द.    

                उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला सकारात्मक निर्णय...    शिक्षक भारती  राज्यमंत्री मान.कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य कला शिक्षकच्या पाठपुराव्याला यश !  

                                                  

 प्रतिनिधी : हेमंत घाटाळ .

         राज्यातील कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यातील सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. त्या अनुषंगाने कला संचालनालयाने इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांकरीता येत्या 22 व 23 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रेड परीक्षेचे ऑनलाइन प्रणालीद्वारे या ग्रेड परीक्षा आयोजनाचे वेळापत्रक मुंबई येथील महाराष्ट्र शासनाचे कला संचालनालयाने जाहीर केले होते. सदर ऑनलाइन परीक्षेचे आयोजनात असंख्य जाचक शर्तींचा अटी शर्तीचे समावेश करण्यात येऊन या परीक्षेच्या पूर्वीचे शंभर रुपये परीक्षा शुल्क ऐवजी दोनशे रुपये व त्यावर बँकिंग शुल्क एकोणावीस रुपये, असे 219 रुपये शुल्क आकारण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार होता.परीक्षेचे आवेदन भरतांना विद्यार्थ्याने डोमेशिअल प्रमाणपत्राची ही सक्ती केली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपये मोजावे लागणार होते. सदर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचे अँड्रॉइड मोबाईलचे कॅमेरासमोर घरीच तब्बल तीन तास बसून हा चित्रकलेचा पेपर सोडवायचा होता. परीक्षेच्या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन करताना असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध आहे. तसेच निवडकच विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होऊ शकले असते. परंतु राज्यातील 80 टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्याने विक्रमगड. जव्हार, तलासरी, मोखाडा, डहाणू, वाडा, पालघर  ह्या ठिकाणी तसेच देशातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी खूप अडचणी असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी गोरगरीब ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी आयोजित ऑनलाईन ग्रेड परीक्षेपासून वंचित राहिले असते. त्यामुळे शिक्षक भारती राज्यमंत्रि आमदार  कपिल पाटील साहेब व महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघाने या ऑनलाईन परीक्षेबाबत सर्व तांत्रिक बाबींचे एकूण आजवर अनेक निवेदने दिली आहेत. त्यावर कला संचालकांना उत्तर देखील देता आले नसल्याने या परीक्षांबाबत घेण्यात आलेला निर्णय अखेर पुन्हा माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व उच्च व तंत्र शिक्षण सचिव कला संचालक यांच्याकडे गेला त्यावर विद्यार्थी हितार्थ या परीक्षांबाबत निर्णय निश्चित व्हावा यासाठी  राज्य मंत्री आमदार मान .कपिल पाटील साहेब  (शिक्षक भारती ),महाराष्ट्र राज्य कला शिक्षक ,   यांनी प्रत्यक्ष कला संचालक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचे  प्रत्यक्ष भेट घेऊन सदर ऑनलाईन ग्रेड परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून या परीक्षेचे आयोजन तात्काळ रद्द करण्याची आग्रही मागणी लावून धरली त्या अनुषंगाने माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी तातडीने आपल्या मंत्रालयीन कक्षात संघटना प्रतिनिधी सर्व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करून या बैठकीत सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेऊन, शालांत परीक्षेचे आयोजन आणि नंतर लगेच एप्रिल.2022 या महिन्यात शाळा स्तरावर पूर्वीचे प्रचलित नियमानुसार परीक्षा आयोजन याप्रमाणे परीक्षा आयोजित करण्याची कला संचालक यांना स्पष्ट निर्देश दिले असून या निर्णयामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता ग्रेड परीक्षेचे इयत्ता दहावीचे शालान्त परीक्षेनंतर एप्रिल महिन्यात या परीक्षेचे आयोजन होणार असून या ऑनलाइन परीक्षेचे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचीही तरतूद केली जाणार आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे हिताचा सकारात्मक निर्णय माननीय उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत साहेब यांनी घेतल्याने यांचे शिक्षक  भारती व विद्यार्थी पालकांचे तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षकचे यश . त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांना दिलासा मिळाला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या