मुंबई विमानतळास महानायक वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी




            ।।  निवेदन  ।।

                

प्रति,

मा. ना. उद्धव ठाकरे साहेब,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय, मुंबई-३२


यांचे सेवेशी.


विषय : नवी मुंबई विमानतळाला नवी मुंबईचे शिल्पकार''विकासाचे महानायक' वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देणे बाबत.


मा. मुख्यमंत्री महोदय, 

'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' , 'कृषी-औदयोगीक क्रांतीचे जनक' तथा 'नवी मुंबईचे शिल्पकार' वसंतरावजी नाईक यांचे कर्तृत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे.

      महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करीत असतांना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबई उभारणी केली. तत्कालिन विरोधी पक्षानी नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शवीला होता, परंतु दूरदृष्टी असणारे 'विकासाचे महानायक' वसंतरावजी नाईक साहेब यांनी नवी मुंबई उभारली, हे देशभर सर्वश्रुत असतांना त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतरावजी नाईक साहेबांचे नाव देणे अतिशय समर्पक आणि उचित ठरेल.

     आधुनिक महाराष्ट्राला घडविणार्‍या नाईकसाहेबांच्या सन्मानार्थ भरिव आणि ऐतिहासिक असे आजवर काहीही दिसून आले नाही हे दुर्देवी आहे. वसंतरावजी नाईक जन्मशताब्दीवर्ष अंतर्गत प्रस्तावित अनेक बाबी आजही प्रलंबीत आहेत. हे अतिशय खेदाने म्हणता येईल. 

        नाईकसाहेबांच्या अनुयायात, ओबीसी मागासवर्गिय,बंजारा समाजात याविषयी प्रचंड अस्वस्थता आहे. १ जुलै कृषिदिन (वसंतरावजी नाईक जयंती) या पावनपर्वावर नाईकसाहेबांच्या नावाने विशेष घोषणा व निर्णय होतील, अशी आपणाकडून अपेक्षा आहे.

      तरी कृपया 'नवी मुंबईचे शिल्पकार' असलेले वसंतराव नाईक साहेब यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देऊन त्याचे 'वसंतरावजी नाईक नवी मुंबई विमानतळ' असे नामकरण करण्यात यावे, ही नम्रपूर्वक विनंती.


                    (स्वाक्षरी)

श्री--------------------------------------


           

प्रतिलिपी:-

१) मा. शरदचंद्र पवार साहेब, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१) मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री

२) मा. ना. नाना पटोले साहेब, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस पार्टी

       ★ जाहिरात★



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या