तांडा वस्ती सुजलाम सुफलाम करणार निधीची कमतरता भासू देणार नाही - आ. मंगेश चव्हाण

 तांडा वस्तीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- आमदार मंगेशदादा  चव्हाण




चाळीसगाव= दिनांक 12 जुन तालुक्यातील तांडा वस्तीच्या विविध समस्या बाबत चर्चा करून त्यावर उपाय योजना तयार करणे व तांड्याचा विकास आराखडा तयार करण्या करिता आज रोजी आमदार श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालय चाळीसगाव येथे गोर बंजारा सरपंच संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती,आ.चव्हाण यांनी तांडा वस्तींच्या विकासकामांसाठी सर्वोतोपरी मदत करून कोणत्याही प्रकारे तांडा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले, त्याचबरोबर तांड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या. पक्के रस्ते. वीज. रेशन कार्ड. अनेक तांड्यांना महसुली दर्जा देणे. स्वच्छ भारत मिशन. वाढीव वस्तीत लाईट बसविणे या सारख्या सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून तालुक्यातील गोरगरीब जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव  प्रयत्न करीन, तसेच चाळीसगाव येथील बंजारा विकास मंडळाच्या पवार वाडी येथील जागेत 40 लाख रुपयांचा भरीव निधी देऊन  लवकरच त्या जागेवर समस्त तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसाठी समाजाच्या हक्काचे सभामंडपाचे काम करण्यात येईल अशी ग्वाही आ.चव्हाण यांनी यावेळी दिली.


या बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक राजूभाऊ राठोड. तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्रसिंग राठोड. नमोताई राठोड.विनित राठोड. बंजारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राठोड. विजाभज अध्यक्ष दिनकर राठोड. युवा मोर्चा अध्यक्ष सुनिल पवार.अनिल चव्हाण,  डॉ. प्रकाश राठोड. निलेश राठोड. जगन पवार.राठोड सुभाष.संतोष राठोड. गोरख राठोड. गोरखनाथ राठोड.गुलाब राठोड.वाडीलाल राठोड. संग्राम जाधव.योगेश्वर राठोड.अशोक राठोड.विलास जाधव विष्णू टेलर.सह ई.मान्यवर उपस्थित होते

        जाहिरात




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या