स्टुडंट्स चॅरीटी फाऊंडेशनच्या सर्व समाजसेवी सदस्यांचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते अभिनंदन
----------------
----
जळगाव -- येथील शहरातील स्टुडंट्स चॅरीटी फाऊंडेशनच्या सर्व समाजसेवी सदस्यांनी आजवर विविध उपक्रम राबविले आहेत. नुकतेच शहरातील रिक्षा व्यवसायिकांना किराणा किटचे वाटप केले. या सर्व सदस्यांचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. *आपण शिक्षण करीत असताना आज समाजातील वंचित शेवटच्या घटकाला प्रत्यक्ष मदत मिळवुन दिली. ही बाब अभिनंदनीय आहे. सध्या कोरोना महामारीत अनेक पालकांकडे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसा नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला असून यासाठी केंद्र सरकारने बँकांना कुठलीही जाचक अटी शर्ती न ठेवता सुलभ कर्ज पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले असून त्यांचा प्रसार आणि प्रचार आपण करावा अशी सूचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली*. यावेळी नेहल मोडक,संस्कृती नेवे,दिव्यांशु जैन,विनिता पाटील,चाहत कटारिया,सयाजी जाधव,वेदांत दुसाने,अक्षद बेंद्रे , उमेश देशमुख,सागर निकम,दिनेश पाटील आदि विद्यार्थी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या