अनोखा उपक्रम , चाळीसगाव येथे महिला ग्रामसभेत सॉनेटरी किट वाटप

 चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे अनोखे उपक्रम; महिला ग्राम सभेत सॉनेटरी पॉड वाटप



 चाळीसगाव- प्रतिनिधी

विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असणाऱ्या चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने महिला ग्रामसभा आयोजीत करण्यात आली विशेष उपक्रम राबविले आहे. या उपक्रमांतर्गत दहा टक्के निधी खर्चून मोफत सॉनेटरी पॉड उपलब्ध करून दिले आहे.


चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून महिला बालकल्याणाचे दहा टक्के रक्कम खर्चून गावातील 200 हून अधिक महिलांना मोफत सॉनेटरी पॉड आज सकाळी ८:३० वा वाटप करण्यात आले. सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले

तत्पूर्वी या अभिनव उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचे कौतुक होत असून गेल्या पाच वर्षांपासून सदर ग्रामपंचायतीने यशस्वी वाटचाल केली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातून त्या अग्रेसर राहिल्या आहे. 

याप्रसंगी विकासो माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, तारा बाई कडू बाई अरुणा बाई रुखमा बाई वत्सला बाई विमल बाई मुक्ताबाई सुशीला बाई शेवंताबाई ताई बाई तेजलिबाई मलीबाई,हाऊसिबाई, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या