चैतन्य तांडा येथे आज स्वामी विवेकनंद जयती साजरी

 चैतन्य तांडा येथे आज स्वामी विवेकनंद जयती साजरी 



 चाळीसगाव- प्रतिनिधी: विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असणाऱ्य चैतन्य तांडा स्वामी विवेकानंद यांची जयंती आठ वाजता साजरी करण्यात आली असून स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्रावर भोंग्यांमार्फत गावात जीवन चरित्र बाबत माहिती देण्यात आली आहे. युवक तयार कसे होणार बाबत महिती व वातावरण गावात निर्माण करण्यात आला असून

चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने सकाळी ८:०० वा जयंती साजरी करण्यात आले. सरपंच अनिता दिनकर राठोड यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांचे पूजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचे कौतुक होत असून गेल्या पाच वर्षांपासून सदर ग्रामपंचायतीने यशस्वी वाटचाल केली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातून त्या अग्रेसर राहिल्या आहे. 


याप्रसंगी विकासो माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, शालेय समिती अधेक्ष्य लिंबा तवर, नायक खिमा राठोड, सदस्य वसंत राठोड,प्रकाश राठोड,भाऊलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण,साईनाथ राठोड, संदीप पवार, पदम तवर ,कैलास राठोड, ,गणेश चव्हाण,गोरख राठोड, ममराज राठोड, गोकुळ राठोड,सुनील काका,,देविदास राठोड,किसन राठोड, शुभम राठोड, ईश्वर चव्हाण,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या