असाही एक उपक्रम :चैतन्य तांड्या'ची धमाल

 तमाशाला बाय बाय; सांस्कृतिक कार्यक्रमातून "चैतन्य तांड्या'ची धमाल



 चाळीसगाव - तालुक्यातील चैतन्य तांड्यात दरवर्षी "मोती माता आई'यांच्या यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या तमाशाला यंदा गावकर्‍यांनी बाय बाय करून जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम भरविण्यात आले. यावेळी आबालवृद्धांनी मनोरंजनाचा अभूतपूर्व आनंद लुटला.  


 चैतन्य तांडा येथील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक मंडळी यांनी आधुनिकतेची कास धरून खेड्या गावात वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या तमाशाला फाटा देत मोती माता आई' यांच्या यात्रेनिमित्त १३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 


सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोनि राहुल पवार, पं.स. गट शिक्षण विस्तार अधिकारी विलासजी भोई उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, लोकसंदेश, साक्षरता अभियान, कुटुंब कल्याण, संस्कार मूल्य यावर आधारित मुकाभिनय, नाटिका सादरीकरण केले. यात मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, ग्रामस्थ व पालकांनी सहभाग नोंदविला. दरम्यान विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह वितरित करून असा अभिनव उपक्रम सर्व गावांनी राबवावा असे आवाहन मान्यवरांनी केले. 


याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनकर राठोड, केंद्रप्रमुख सतीश राजपूत, ग्रामीण पोलीस नाईक, गावातील सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सदस्य, गावातील शिक्षण प्रेमी मंडळी, विद्यार्थी, पालक व केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या