मोहने-आंबिवली येथे दि.२७'सप्टेंबर(शनिवार) रोजी बंजारा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न.

 मोहने-आंबिवली येथे दि.२७'सप्टेंबर(शनिवार) रोजी बंजारा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न.


 हैद्राबाद गॕझेट नुसार ST(अनुसूचीत जमाती) चे आरक्षण लागू व्हावे यासाठी  बंजारा आरक्षण समिती, ठाणे जिल्हा यांच्यावतीने दि. ४ ऑक्टोबर २०२५ शनिवार रोजी सकाळी ११ः०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चा च्या नियोजन व सहभागी होण्याच्या संदर्भात मोहने-आंबिवली येथील सःत सेवालाल महाराज मंदिरावर दि.२७'सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली.

  या बैठकीस मोहने-आंबिवली,अटाळी,नेपच्यून आणि टिटवाळा येथी समाज बांधव उपस्थित होते.प्रत्येकांनी आपले विचार मांडले व मोर्चा मधे जास्तीतजास्त समाजबांधवांना कसे उपस्थित रहायचे याबद्दल चर्चा करण्यात आली.या मोर्चासाठी मोहने-आंबिवली परिसरामधे लागणारे १० प्रचार बॕनर हे येथील समाजसेवक तथा चिरंजीव लहान मुलांचे हॉस्पिटल चे संचालक-डॉ.युवराजभाऊ राठोड यांनी छपाई करुन देण्याचे जाहीर केले.तसेच डोंबिवली येथील समाजसेवक-देविदासभाऊ चव्हाण यांनी सर्व समाजबांधवांनी या मोर्चा मधे पारंपारिक बंजारा पोशाख परिधान करून उपस्थित रहावे असे आवाहन केले.

या बैठकीला तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख-कैलासभाऊ पवार,जिल्हा अशासकीय सदस्य-कैलासभाऊ तंवर,अनिलभाऊ राठोड,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,आंबिवली तांड्याचे कारभारी-कपुरचंद पवारसाहेब,पत्रकार तथा मुंबई धर्मादाय रुग्णालय समितीचे सदस्य-कविराजभाऊ चव्हाण,समाजसेवक-करसन राठोड,उमेश पवार,विष्णू पवार,विनोद जाधव,रामसिंग चव्हाण,सुनिल जाधव,अनिल राठोड,बंजारा समाज संस्थेचे संचालक तथा पुजारी-विठ्ठल राठोड,रमेश राठोड,सुरेश नाईक,अजय जाधव,श्रीराम पवार,सोमलू पवार,संतोष पवार,अशोक चव्हाण,ईश्वर राठोड,किरण राठोड,थानसिंग राठोडसर,दिलीप चव्हाण,टिटवाळा येथील समाजसेवक-अंकुशभाऊ चव्हाण,केवलसिंग तंवर,संतोष राठोड,यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.





------------------------------------------------------------------


------------------------------------------------------------------


-----------------------------जाहिरात---------------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या