4 ऑक्टोबर रोजी ठाण्यात बंजारा समाजाचा भव्य विराट मोर्चा
प्रतिनिधी
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ठाणे कलेक्टर कार्यालयासमोर भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बंजारा समाज आरक्षण समिती, ठाणे जिल्हा यांच्या वतीने हा मोर्चा आयोजित केला असून, "एक गोर… सव्वा लाखेर जोर" या घोषणेसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
समाजाचे म्हणणे आहे की, हैद्राबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजास आरक्षणाचा ठोस आधार मिळाला असून, त्याअनुषंगाने घटनात्मक अधिकार मिळणे आवश्यक आहे. "संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही" या निर्धाराने लाखोंच्या संख्येने समाजबांधव रस्त्यावर उतरणार आहेत.
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाचा हा विराट मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आयोजक : बंजारा समाज आरक्षण समिती, ठाणे जिल्हा




0 टिप्पण्या