तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत देवळी आश्रम शाळेचे यश


प्रतिनिधी चाळीसगाव :



नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे नुकतेच तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन चाळीसगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.विलासराव आनंदराव भोई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा समन्वयक श्री.अजय गोपाळराव देशमुख, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.आदित्य कैलासराव सूर्यवंशी, शाळेचे प्राचार्य श्री.सतीश पाटील, मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार उपस्थित होते. 

        सामन्यांमध्ये तालुक्यातील अनेक शाळांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. या सामन्यांमध्ये देवळी आश्रम शाळेच्या 19 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ प्रथम क्रमांक , 17 वर्षे वयोगटातील मुलींचा संघ प्रथम क्रमांक, 17 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ द्वितीय क्रमांक 14 वर्षे वयोगटातील मुलांचा संघ द्वितीय क्रमांक मिळवीत आपले स्थान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निश्चित करीत यश संपादन केले आहे. यशस्वी झालेल्या सर्व संघांचे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब कैलासराव सूर्यवंशी, संचालिका माईसाहेब जयश्री सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी झालेल्या संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.शरद सूर्यवंशी, श्री.साहेबराव निकम, श्री.संदीप देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालुक्यातील क्रीडाशिक्षक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या