केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची सकारात्मकता..!
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ वरील कन्नड (औट्रम) घाटातील बोगद्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत असलेला संभ्रम दूर व्हावा व लवकरात लवकर कार्यवाही होऊन केवळ चाळीसगावचं नव्हे तर खान्देश व मराठवाड्याच्या विकासातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. @gadkari.nitin जी व मुख्यमंत्री श्री. @devendra_fadnavis जी यांची जलसंपदा मंत्री श्री. @girishdmahajan भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत भेट घेतली व या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले.
यावेळी श्री.नितीनजी गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रेल्वे मंत्रालय यासोबत बैठक होऊन कन्नड (औट्रम) घाटात संयुक्तपणे रस्ता व रेल्वे बोगदा करण्याविषयी चर्चा झाली होती मात्र त्यासाठीचा खर्च हा खूप जास्त होत असल्याने पहिला टप्प्यात राष्ट्रीय महामार्गावरील 12.75 किमी रस्त्याचा बोगदा + व्हायाडक्ट करण्याचे निश्चित केले असून जवळपास २६०० कोटींच्या या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे आश्वस्त केले.
0 टिप्पण्या