देवळी येथे विध्यार्थी प्रवेशोत्सव साजरा

देवळी आश्रमशाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा




नानासो उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालक अधिकारी श्री.वासुदेव बच्छे , देवळी गावाचे सरपंच श्री.अरुण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सौ. चंद्रकला पाटील, संस्थेचे सचिव श्री.आदित्य सूर्यवंशी, संस्थेचे संचालक श्री.ऋषिकेश सूर्यवंशी, तसेच शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक श्री. सतिष पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार यांनी केले.

         शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेशित तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे ढोल ताशाच्या गजरात औक्षण करून व गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना नविन पुस्तके, शाळेचा नवीन गणवेश व मिठाई वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. 

        कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन पाटील तर आभार श्री. प्रशांत पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या