रोजगार हमी च्या नीधी साठी शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

 रोजगार हमी च्या नीधी साठी शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन



कन्नड.. कन्नड पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक कामांचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांना प्रशासन डोळेझाक करीत असल्याच्या निषेधार्थ दि.26 मे रोजी भाजप संभाजीनगर जिल्हाउपाध्यक्ष सुभाष काळे यांच्या नेतृत्वात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. याबाबत श्री काळे यांनी सांगितले की,

मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पंचायत समिती कन्नड अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक सिंचन विहीर, गुरांचे गोठे, वृक्ष लागवड, शेततळे, घरकुल, पांदण रस्ते आदी प्रकारचे कामे मंजूर करण्यात आली. यात अनेक शेतकरी सदरील योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावण्याच्या आशेपोटी या चक्रव्यूहात अडकले गेले. अनेकांनी दागिणे गहाण, सावकारी कर्ज घेऊण वैयक्तिक लाभांची कामे केलीत. यातील काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या त्या आधारे त्यांनी योजनेचे निकषाप्रमाणे कामे करून घेतली. सरकारी पैसे आज न उद्या मिळतील या आशेवर जवळ पैसे नसताना त्यांनी बाहेरून सावकार, नातेवाईकां कडून हात उसने पैसे आणुन अशा प्रकारे कामे पूर्ण केली. प्रतीक्षेचा कालावधी दोन तीन महिन्या पर्यंत काही वाटले नाही. परंतु आता एक ते दोन वर्षे उलटून गेले? शासनाचा निधी न आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आम्ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने ग्रामीण भागात फिरत असताना अनेकजण विचारतात की आमचे पैसे केव्हा येईल, आमचे पैसे येतील का ? आम्ही शासन स्तरावर माहिती घेतली, निश्चित वेळेचा अंदाज आला नाही. जी प्रशासकीय यंत्रणा ज्या प्रमाणात कामांच्या प्रशासकीय मान्यता वाटण्यासाठी जितकी तत्पर होती. त्या तत्परतेने पुढील कारवाई न झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आणि त्याचा परिणाम अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने दि. 25 मे रोजी कन्नड पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परंतू त्याची पंचायत समिती प्रशासनाने कोणती ही दखल घेतली नाही असे आंदोलकांचे म्हणने आहे. त्यामुळे सोमवारी आत्मक्लेश आंदोलनात प्रशासनाला धारे वर धरण्यात आले. 



या आंदोलनात भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुभाष काळे यांच्या सहमा. उपसभापती सुनील निकम, कैलाश जाधव श्रीराम दादा जंजाळ, विलास भोजने, राजेंद्र भोजने, रूमदेव चव्हाण, विष्णू राठोड, गणेश चव्हाण, गणेश पवार, भक्तराज मुळे, संजय मुगले, रावसाहेब वर्पे, रामदास खवळे, कचरू सावंत, अमरसिंग राठोड, वाल्मीक निर्माळ, आप्पासाहेब नलावडे, सुदाम पवार, रामा राठोड, अर्चनाताई पवार, सुनिता निंभोरे, अकीला शेख, हौसाबाई चव्हाण, माधव भोजने, कृष्ण नलावडे, अरुण थोरात, विजय राठोड, शशिकांत नागरे, धीरज पाटील, बाबासाहेब काळे, संतोष बारगळ, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या