छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला विरोध करणाऱ्या विकृत मनोहर भिडेचा निषेध
तहसीलदार यांना रयत सेनेच्या वतीने निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी
चाळीसगाव - किल्ले रायगड येथे दरवर्षी प्रमाणे संभाजीराजे छत्रपती यांच्या आयोजनातुन शिवप्रेमींच्या उपस्थित ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शिवप्रेमी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात.विकृत मनोहर भिडे च्या नजरेत भव्यदिव्य राज्यभिषेक सोहळा खुपत असल्याने ६ जून ला होणारा राज्यभिषेक कार्यक्रम बंद करण्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने मनोहर भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार द्वारा रयत सेनेच्या वतीने दि २४ मे २०२५रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,
महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी दुर्गराज रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भुमीला नतमस्तक होऊन आपल्या माथी पवित्र माती लावतात यामुळे तरुणांना ऊर्जा मिळते या शिवराज्यभिषेक सोहळ्याचा तिथी आणि तारखेचा वाद उभा करून गालबोट लावण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक विकृत मनोहर भिडे रचत आहे. दुसरी बाब हा भिडे कायम आपल्या हरामखोर विकृतीतून छत्रपतीचा अनादर करतो. आणि आपले सरकार त्याला नेहमीच पाठीशी घालून एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमीच्या भावना दुखाविण्याचें काम करत असल्याने अशा विकृत ना-लायक माणसावर राष्टद्रोहाचा गुन्हा सरकारने दाखल केला पाहिजे.दरवर्षी ६ जून रोजी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन रद्द करा व त्याठिकाणी असलेला वाघ्या कुत्रा काढू नका अशी मागणी करून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखाविण्याचे काम या विकृतांने केले आहे.खोटा इतिहास सांगून जनतेच्या माथी मारलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासंबंधित विषय असो की इतर इतिहास खोटा सांगून युवा पिढीची डोकी भडकावून आपले इच्छित साध्य करण्याचे काम मनोहर भिडे करत असला तरी शिवशंभू च्या महाराष्ट्रात अशी सडकी मानसिकता कदापी शिवप्रेमी खपवून घेणार नाहीत,
याने एकीकडे यांच्या संघटने मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मराठा व इतर बहूजन समाजाच्या तरुणांचा पाठिंबा मिळवून मनोहर भिडे याने जण माणसात नावलौकिक मिळविला आणि ज्यांच्या नावावर मोठा झाला त्याच युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करण्याचे काम केले आहे. याचा बोलविता धनी कोन हे उभा महाराष्ट्र जाणतो मात्र मनोहर भिडे तुमच्या सात पिढ्या जरी आल्या तरी दुर्गराज रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा कदापी बंद होऊ शकत नाही.यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रक्ताचे पाट वाहिले तरी ही परंपरा कधीच खंडीत होणार नाही.आपल्या विकृत बुद्धीची एका बाजूला किव ही करावीशी वाटते कारण आपल्या लायकी पेक्षा सरकारने आपल्याला अधिक महत्त्व दिल्यामुळे आपली विकृती वाढत गेली.भिडे तू ज्या सरकार कडे मागणी करत आहे त्या सरकार मध्ये तेवढी हिंमत आणि ताकद नाही शिवराज्याभिषेक दिन बंद करण्याचा,तुझे नाव मनोहर असताना तूला स्वतःतच खर नाव लावायची लाज वाटते म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांचे नाव लावतो.जरा तुला लाज कशी वाटत नाही.वय गेल पण सोय आली नाही,साठी पार बुद्धी तुझी नाटी झाली,मानसिक विकृती तेवढी तुझी शिल्लक राहिली.मात्र शिवप्रेमींच्या अस्मिता असलेला ६ जून राज्याभिषेक दिन सोहळा या धर्तीवर चंद्र-सूर्य तारे असे पर्यंत सुरू राहील,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मनोहर भिडे याला पाठीशी न घालता त्याला रायगडावर पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नतमस्तक व्हायला सांगा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमीची त्याच रायगडावरून जाहीर माफी मागायला सांगा,आणि त्याला सांगा गुरूजी आपले आता वय झाले आहे.तुम्ही असं काहीही बरळत जाऊ नका अशी सक्त सूचना द्यावी,यापुढे असे शिवप्रेमींची भावना दुखविण्याची हिम्मत करू नये अशी समज द्यावी.अन्यथा त्यांच्या वरचा वरदहस्त बाजूला काढून ठेवा महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमी ,रयत सैनिक मनोहर भिडे याला याची जागा दाखविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत. यावेळी रयत सेनेच्या वतीने मनोहर भिडेचा जाहीर निषेध करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने मनोहर भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना चाळीसगाव प्रभारी तहसीलदार संदेश निकुंभ द्वारा रयत सेनेच्या वतीने दि २४ मे २०२५ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,निवेदनावर प्रदेश समन्वयक पी एन पाटील,शहर अध्यक्ष प्रदीप मराठे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,संघटक शिवाजी गवळी,शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर संघटक दिपक देशमुख, रयत वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी,प्रा चंदकात ठाकरे,गोकुळ पाटील,कुणाल पाटील,जयेश पाटील,प्रवीण पवार, आबा वाणी,राजेंद्र आगोने,गोविंदा वाघ,निलेश गवळी यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
0 टिप्पण्या