अवघ्या १२ तासात अटक, चाकण पोलिसांची कामगिरी

 चाकण गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी

चाकण येथील कामावर चाललेल्या महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या अनोळखी इसमाचा शोध घेऊन गुन्हे शाखा युनिट 3 कडून आरोपीस 12 तासात अटक



चाकण प्रतिनिधी  आज रोजी चाकण पोलीस ठाणे हददीत बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे फिर्यादी या रात्रौ 10.55 वा.नाईट शिफट करीता कंपनीमध्ये पायी जात असताना एका अनोळखी इसमाने मागुन येवुन फिर्यादी यांचे तोंड दाबुन व तिस ओढत शाळेचे बाजुचे रस्त्याने मोकळया जागेत घेवून गेला. तेथे फिर्यादीचे तोंड दाबुन ओरडु नको ओरडलीस तर तुला मारुन शेजारचे विहीरीत टाकीन अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याचे हाताचा चावा घेतला होता. पंरतु सदर ठिकाणी अंधार असल्याने व आजुबाजुस कोणी नसल्याने जीवाचे भितीने फिर्यादी यांनी आरडा ओरड केली नाही. त्यावेळी त्याने फिर्यादीस विहीरीत टाकुन दयायची धमकी देवुन तिचे इच्छेविरुध्द बलात्कार केला होता.

 

सदर घटने बाबत चाकण पोलीस ठाणे गु.र.नं.306/2025 भा.न्या.संहीता कलम ..69 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. वरीष्ठांनी सदर गुन्हयाचे समांतर तपासाचे अनुशंगाने गुन्हे शाखेकडील सर्व तपास पथकाना सुचना दिलेल्या होत्या. सदर अनोळखी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना मिळालेल्या गोपनीय बातमी घ्या आधारे गुन्हे शाखा युनिट 3 चे तपास पथकाने सदर आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे वय 21 वर्ष रा. बालाजी नगर मेदणकर वाडी ता. खेड जि. पुणे मुळ रा. अकोले जि अहमदनगर यास शिताफिने बालाजीनगर मेदनकरवाडी येथून ताब्यात घेतले.सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.गुन्हे शाखा युनिट तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, राजकुमार हनुमंते, यदु आढारी, सचिन मोरे , मनोज साबळे, त्रिनयन बाळसराफ, संदीप सोनवणे, प्रदीप राळे, विठ्ठल सानप, योगेश कोळेकर, सुधीर दांगट, समीर काळे, ऋषिकेश भोसुरे, शशिकांत नांगरे, राहुल सूर्यवंशी, रामदास मेरगळ, यांनी सदरची कामगिरी केली आहे.


चाकण पोलिसांनी इतक्या लवकर आरोपीस ताब्यात घेतल्या मुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या