देवळी आश्रमशाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षेत यश शाळेचा निकाल शंभर टक्के



        नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत सुयश शाळेचा निकाल लागला शंभर टक्के. 

       शाळेतील विद्यार्थिनी कु.निलम करणसिंग बारेला ८५.२०टक्के मिळवीत शाळेतून प्रथम व कु.निधी दिनेश पावरा ८४.०० टक्के कु. पार्वती भाऊसिंग पावरा ८४.०० टक्के मिळवीत शाळेतून द्वितीय क्रमांक तर कु. सीमा भगवान पावरा ८३.८० टक्के गुण मिळवून शाळेतुन तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. 

       शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब कैलासराव सूर्यवंशी, सचिव दादासाहेब आदित्य सूर्यवंशी, संचालिका माईसाहेब जयश्री सूर्यवंशी माध्यमिक मुख्याध्यापक श्री.सतीश पाटील प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार शाळेतील सर्व शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.