चाळीसगाव सकल मराठा समाजाची बैठक संपन्न
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची 3 डिसेंबर रोजी चाळीसगावात विराट जाहीर सभा
चाळीसगाव - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर मराठा समाजाशी संवाद सभेतून साधत आहेत. त्याच अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील जरांगे पाटील यांच्या दौऱ्यास सुरुवात होणार असून चाळीसगाव शहरातील नारायणदास अग्रवाल क्रिडा संकुल मोठ्या कॉलेजचे ट्रॅक ग्राउंड करगाव रोड येथे मनोज जरांगे पाटील यांची दि ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता विराट सभा होणार आहे,या विराट सभेला चाळीसगाव शहर व तालुक्यातील तसेच भडगाव ,पाचोरा,पारोळा,नांदगाव ,कन्नड तालुक्यातील मराठा बांधव,भगिनी मराठा समाजाच्या विविध संघटना,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे,शहरातील शासकीय विश्राम गृह येथे दि २८ रोजी सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली त्यात सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांची सभा घेण्याचे ठराव करण्यात आला यावेळी ग्रामीण व शहरातील बांधव मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

0 टिप्पण्या