काचेवरील दव पुसण्याचे नादात ताबा सुटून तवेरा कन्नड घाटात कोसळली...
4 ठार - चालकासह 6 जखमी...
चाळीसगाव - अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेवून मालेगाव कडे जाणाऱ्या तवेरा वाहन चालकाने काचेवरील दव पुसण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटून कन्नड घाटात तब्बल 300 फूट खोल दरीत तवेरा कार पडून 4 जण जागीच मयत झाले
तर तवेरा वरील चालकासाह 6 जण गंभीर जखमी झाले असून जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला तवेरा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मालेगाव येथील भाविक दिनांक 26/11/2023 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तवेरा वाहन क्र. MH 41 V 4816 ने अक्कलकोट येथुन स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेवून मालेगांव जात असतांना कन्नड घाटात समोरील काचेवर दव जमा झाल्याने सदर वाहन चालकाने जमा झालेले दव वाहनाचा वेग कमी करुन किंवा थांबवुन पुसुन घेणे आवश्यक असताना
तसे न करता वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी न करता काचेवरील दव पुसण्याचा प्रयत्न करित असतांना चालक अभय पोपटराव जैन 50 (रा सटाणा नाका मालेगाव जि नाशिक) याचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे वाहन खोल दरीत जवळपास 300 फूट कोसळून झालेल्या अपघातात
सौ.वैशाली धमेंद्र सुर्यवंशी 42, प्रकाश गुलाबराव शिर्के 68, सौ. शिलाबाई प्रकाश शिर्के 62, कु. पुर्वा गणेश देशमुख 7 सर्व रा. मालेगांव जि. नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह अनुज धर्मेद्र सुर्यवंशी 19, कृष्णा वासुदेव शिर्के 5, सौ.पुष्पा पुरुषोत्तम पवार 41, सिध्देश पुरुषोत्तम पवार 7, सौ. रुपाली गणेश देशमुख 35 हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महामार्ग API रुपाली पाटील, psi योगेश माळी, Asi राजेंद्र साळुंखे, phc संदीप पाटील, शंकर जंजाळे, नंदु परदेशी, युवराज नाईक, भुपेश वंजारी, विजय शिंदे, ज्ञानेश्वर बडगुजर, संदीप माने, मनोज पाटील, नरेंद्र बाविस्कर, जोशी व चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ राहुल सोनवणे, नितिन वाल्हे, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भुषण पाटील, अमित बाविस्कर, पोकाँ समाधान पाटील, ज्ञानेश्वर गिते व महामार्ग पोलीस स्टेशन चे पोहेकाँ गणेश काळे, विरेंद्र शिसोदे, शांताराम थोरात, सुशिल पाटील, योगेश पवार, विकास खैरनार, पोना जितेंद्र माळी, पोकाँ ललित महाजन, गणेश पवार यांनी सर्वांनी तात्काळ मदत कार्य केले. तसेच सदर अपघात स्थळी चाळीसगांव पोलीसांनी मदतीचे आवाहन केले असता स्वत:चे जिवाची पर्वा न करता खोल दरित पोलीसांसोबत खाली उतरुन जखमींना वर आणण्यात मदत करणारे चाळीसगांव शहरातील वसिम चेअरमन,
स्वप्निल जाधव, नवाज शेख राजु, मुज्जफर रज्जाक शहा, ईकबाल शेख निसार, फरीद खान, मुबारक खान, सलिम खान, इम्रान खाटीक, सिंकदर शेख, जुबेर खाटीक, नईम खाटीक, गोगा शेख (पहेलवान) यांचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आभार मानले तसेच त्यांचा पो.स्टे.च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे .

0 टिप्पण्या