चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 2107 मोफत आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन गार्ड) सोबत सरल ॲप डाउनलोड करण्याचा बहुमूल्यमान श्री.प्रविण शिवाजीराव मराठे
यांना मिळाल्याबद्दल भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भडगांव येथे सन्मान करण्यात आला.
चाळीसगाव तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून..
चाळीसगाव : शहरात मोफत 2107 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) त्यासोबतच केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बनविलेले सरल ॲप 2107 लाभार्थ्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून दिल्याबद्दल प्रविण शिवाजीराव मराठे यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सन्मान करून विशेष कौतुक केले.
चाळीसगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कट्टर समर्थक श्री.प्रविण शिवाजीराव मराठे यांनी मोफत 2107 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) सोबतच सर्वाधिक 2107 सरला बनवून तालुक्यात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सरल ॲप बद्दल माहिती देताना सांगितले की, प्रत्येकाने हा ॲप डाऊनलोड केल्यापासून दररोज या ॲपवरील माहिती वाचून जनसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे तसेच केंद्र शासनाच्या नवनवीन योजना सर्व घटकांना उपयुक्त योजने संदर्भात परिपूर्ण माहिती भारतीय जनता पार्टी पक्षाकडून समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काढलेला हा ॲप असून सर्वांनी तो डाऊनलोड करून दररोज वापरावा व त्याहून आलेली माहिती ही आपण इतरांना सुद्धा शेअर करावी असे सांगितले.
यावेळी तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण, खासदार मा.श्री.उन्मेषदादा पाटील, जिल्हाध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर पाटील (जळकेकर) चाळीसगाव तालुका निवडणूक प्रमुख श्री.घृष्णेश्वर पाटील (तात्या) तालुका अध्यक्ष श्री.सुनील निकम सर, शहराध्यक्ष श्री.नितीनभाऊ पाटील यांनी सुद्धा प्रविण शिवाजीराव मराठे यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले.
0 टिप्पण्या