चाळीसगाव येथे पोस्टर प्रदर्शन

 चाळीसगाव महाविद्यालयात संगणक विभागात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न



चाळीसगाव दि. ०९/१०/२०२३

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.पी. आर्ट्स एस.एम.ए सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव आयोजित संगणकशास्त्र विषयांतर्गत पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 50 पोस्टर व 10 मॉडेल चे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

       या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी संगणक विषयाचे विविध भागांचे व संगणक भाषेचे पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनच्या साहाय्याने सुंदर सादरीकरण केले.  सदर स्पर्धेमध्ये एफ. वाय, एस. वाय, आणि टी. वाय. बी. एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या हस्ते झाले तर उपप्राचार्य डॉ. अजय काटे ,प्रा. दिपक आवटे , डॉ योगिनी वाघ हे उपस्थित होते.

      यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट चे ज्ञान मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आमच्या महाविद्यालयातील संगणक विभागात असे विविध उपक्रम राबविले जातात. सध्या जगात खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे आणि त्यात जर आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास आणि महाविद्यालयातील उपक्रमामध्ये भाग घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच आपल्या कला गुणांना वाव देऊन आपले ध्येय पूर्ण केले पाहिजे. सदर स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ पोस्टर व मॉडेल यांना प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सदर  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ के. सी. देशमुख, राष्ट्रीय महाविद्यालय यांनी काम बघितले.

      एफ. वाय. बी. एस्सी- प्रथम पारितोषिक कु. वैष्णवी पाटील , द्वितीय पारितोषिक निखिल शर्मा तृतीय पारितोषिक राजश्री नागरे ,एस. . वाय. बी. एस्सी-कु भाग्यश्री पाटील ,द्वितीय पारितोषिक कु. कोमल ठाकरे ,तृतीय पारितोषिक  शेख माहीम तर टी. वाय. बी. एस्सी.- प्रथम पारितोषिक गढरीया साक्षी ,द्वितीय पारितोषिक कु. मैत्रीय पाटील, तृतीय पारितोषिक लिलेश्वर महाजन याना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. योगिनी वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन प्रा. दिपक आवटे, सूत्रसंचालन प्रा. रश्मी साळुंखे यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न प्रा. मोरे हर्षा ,प्रा. पाटील यामिनी ,प्रा. शिरोडे निकिता  प्रा. देशमुख माधुरी , सौरभ त्रिभुवन , शुभम पाटील यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या