चऱ्होली मधील वाघेश्वर महाराज मंदिरात चोरी
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
आळंदी : चऱ्होली बुद्रुक मधील श्री वाघेश्वर महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली . मंदिरातील तीन दानपेट्या मधून 30000 रुपयाची रोकड चोरट्यांनी चोरून नेली . तसेच सीसीटीव्हीची वायर तोडून दान पेट्यांचे कुलूप तोडून त्याचे नुकसान केले . ही घटना मंगळवार (दि . 3 ) ते बुधवारी (दि . 4 )पहाटे साडेपाच वाजण्याच्या कालावधीत घडली .
ज्ञानेश्वर विठ्ठल पठारे (वय 28 . रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत चऱ्होली मधील श्री वाघेश्वर महाराज मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील तीन दानपेट्यांतील सुमारे 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच मंदीरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडली. दानपेट्यांचे कुलुप तोडुन त्याचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन दिघी पोलीस तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या