कुरळी ता. खेड येथील पॉईंटचा राजा मित्र मंडळ यांची विसर्जन मिरवणूक अनोख्या पद्धतीने पार पडली.
खेड प्रतिनिधी: योगेश आल्हाट
पॉईंटचा राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश दशरथ सोनवणे व गणेश सांडभोर यांच्या संकल्पनेतून डीजे वर खर्च न करता व दांगडधिंगा न करता अनोख्या पद्धतीने श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या वारकऱ्यांसोबत टाळ आणि मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली. यासाठी मंडळाचे कार्यकर्ते वारकऱ्या सोबत टाळ घेऊन सामील झाले. तर काही कार्यकर्ते टाळ्या वाजवून वारकऱ्यांना साथ देत होते. पॉईंटचा राजा हा गणेशोत्सव आळंदी फाटा ट्राफिक पोलीस चौकीच्या आत मध्ये असतो. यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभते. इतर मंडळांनी आदर्श घ्यावा अशाच पद्धतीने हा सोहळा पार पडला .
व्हिडिओ जरूर पहा
विसर्जन मिरवणूक पार पाडण्यात अध्यक्ष गणेश सोनवणे, गणेश सांडभोर, अजित सोनवणे ,स्वप्निल पवार, नितीन, राजू, गजू, मोहन, अरविंद, अवि, माऊली, अविनाश, रवी, उद्धव, नामदेव, विलास, बारक्या, या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर सर्व वारकऱ्यांचा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आला.



0 टिप्पण्या