खेड तालुक्यातील कुरुळी केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये फातिमाबी शेख यांची प्रतिमा

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये फातिमाबी शेख यांची प्रतिमा



केंद्र शाळा कुरुळीच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता मधुकर नाईक यांच्या तर्फे व केंद्र प्रमुख श्री.हिरामणदादा कुसाळकर यांच्या हस्ते वाटप

खेड प्रतिनिधी : योगेश आल्हाट

फुले प्रेमी, संविधान दूत कवी विजय वडवेराव आयोजित देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान अंतर्गत क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली.या शाळेतील सावित्रीमाईंच्या सहकारी शिक्षिका व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती व्हावी तसेच आपल्या इतिहासाचे जतन व्हावे या उद्देशाने सोमवार दिनांक ३०/६/२०२५ रोजी कुरुळी केंद्रातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा अशा २० शाळांना या प्रतिमांचे सौ.सुनिता नाईक यांच्या वतीने वाटप करण्यात आले.या प्रसंगी कुरुळी केंद्रातील सुमारे २०० शिक्षक उपस्थित होते.


जिल्हा परिषद कुरुळी शाळेच्या मुख्याधापिका सौ. सुनीता नाईक यांच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या