छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, सहाव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक, किती कमावले?

 विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सहाव्या दिवशीच्या कमाईने पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला आहे. छावाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.



वंचित गावकरी वृंतसंस्था 

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सहाव्या दिवशीही कमाईत घट झालेली नाही

सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 'छवा' ने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली आहे. साधारणपणे चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्या आठवड्यानंतर कमाई कमी होत जाते. पण 'छवा' च्या बाबतीत असे झालेले नाही. सोमवारनंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छवा' ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार कमाईत वाढ झाली.

सोमवारी चित्रपटाने 24 कोटी रुपये कमावले. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी कमाईत वाढ होत गेली

बुधवारी चित्रपटाने तब्बल 32 कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी चित्रपटाने पहिल्या दिवसाचा विक्रम मोडला आहे.

छवा' ने आतापर्यंत भारतात 197.75 कोटी रुपये कमावले आहेत. जगभरात चित्रपटाची कमाई 265 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

परदेशातही चित्रपटाने 30 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 130 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट आता दुप्पट कमाई करण्याच्या मार्गावर आहे.

छावा ' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम आणि प्रदीप रावत, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर, सारंग साठे यांच्याही भूमिका आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या