अजब कारभार ' ग्रामस्थ विकासापासून वंचित

 महाराष्ट्र शासन आपल्या जनतेसाठी नेहमी कल्याणकारी योजना नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या मार्फत राबवित असते काही ठिकाणी फक्त मलिदा खाण्याकरिता कागदोपत्री योजना राबविल्या जातात परंतु काही ठिकाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ग्रामस्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडतो, अशाच काहीसा प्रकार चाळीसगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायत मध्ये घडला आहे 


सौजन्य : गजानन चव्हाण ग्रामपंचायत  सदस्य 

चाळीसगाव : वंचित गावकरी वृंतसंस्था 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि 

ग्रामपंचायत ओढरे येथे 15 वित्त आयोगामध्ये RO फिल्टर मशीन आणून 15 महिने उलटून झाले असून सुद्धा आरो प्लांट बंद असून फक्त मलिदा खाण्यासाठी आरो फिल्टर घेणे हे कितपत योग्य होते ग्रामपंचायत कार्यालय ओढरे येथे 14 ते15 महिने होऊन सुद्धा बंद आहे .याची जबाबदारी सरपंच ग्रामसेवक यांनी घ्यावी की नाही फक्त मलिदा खाण्यासाठी चार ,चार लाखाचे दोन आरोप प्लांट घेतले व त्याचा आतापर्यंत वापर नाही ही ग्रामपंचायतची निष्काळजीपणा असून यावर त्वरित कारवाई व्हावी व त्याची चौकशी करून गटविकास अधिकारी यांनी यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या