संत सेवालाल २८६ जयंती साजरी

 चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे अनोखे उपक्रम;

संत सेवालाल २८६ जयंती साजरी करताना या निमिताने



 जि प शाळेला इंटरॅक्टिव पॅनल व प्रिंटरस इतर साहित्य वाटप 

 चाळीसगाव- प्रतिनिधी: .चैतन्य तांडा येथे ग्रा प व जि .प शाळे कडून संत सेवालाल २८६ वी जयंती साजरी कण्यात आली साजरी करताना विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असणाऱ्या चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने विशेष उपक्रम राबविले आहे .संत सेवालाल जयंती निमिताने या उपक्रमांतर्गत १५ वित्त योजनेतून शिक्षणावर २५ टक्के निधी खर्चून जि प शाळेला इंटरॅक्टिव पॅनल व प्रिंटरस इतर साहित्य वाटप साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषद शाळा चैतन्य तांडा यांच्याकडून गावात मिरवणूक काढून संत सेवालाल जयंती करण्यात आले व ग्रामपंचायत कार्यालय समोर बंजारा भाषेत गाणे डान्स कार्यक्रम करण्यात आले 

रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।

कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीकला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।

जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका।

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका।

जाणंजो छाणंजो पछच माणजो। -भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा। 

ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव। – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल। 

संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.

सेवालाल महाराजांच्या विचारावर चालण्यासाठी कशा पद्धतीने सेवालाल महाराजांची विचार झाला त्या संदर्भात 

सेवालाल महाराजांचे विचार ठेवण्यात आले व नाचत गाजत लेझीम पथक तयार करून गावात चैतन्यमय वातावरण गावात तयार करून सेवालाल जयंती साजरी करण्यात आले तत्पूर्वी या अभिनव उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचे कौतुक होत असून गेल्या पाच वर्षांपासून सदर ग्रामपंचायतीने यशस्वी वाटचाल केली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातून त्या अग्रेसर राहिल्या आहे. याप्रसंगी विकासो माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य वसंत राठोड, भाऊलाल चव्हाण, साईनाथ राठोड, संदीप पवार जुलालसिंग राठोड, खिमा भाऊ राठोड,मधुकर भाऊ राठोड उदलभाऊ राठोड,सुपडू भाऊ राठोड दिलीप राठोड,लखन राठोड( पोलीस पाटील ) गोरख राठोड, लिंब तवर, पदम तवर,रायसिंग भाऊ राठोड,राजेंद्र चव्हाण,कैलास राठोड ,युवराज राठोड,सुनील राठोड,देविदास राठोड जि.प,शाळेच्या शिक्षक बेलदार सर त्यांची टीम महाजन सह इतर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या