केसुला फाउंडेशन या समाजिक संस्थेस तपस्वी संत डॉ.रामराव महाराज आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2025 जाहीर
नाशिक: भारतातील समस्त बंजारा समाजाचे श्री तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन (भारत) आयोजित राष्ट्रसंत डॉक्टर रामराव महाराज आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2025 करिता केसूला फाउंडेशन ची निवड करण्यात आली होती भारतातील विविध राज्यातील 7 संस्थांसह केसुला फाउंडेशन चा ही समावेश होता सदर पुरस्कार सोहळा हा श्री क्षेत्र पोहरादेवी येथे दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी समाजातील विविध मान्यवर तसेच धर्मगुर श्री जितेंद्र महाराज धर्मगुरू श्री कबीरदास महाराज यांच्या उपस्थितीत धर्मगुरू तथा विधान परिषद आमदार डॉ बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन केसुला फाउंडेशनला गौरवण्यात आले. केसूला फाउंडेशन ला मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी उद्योजक तथा केसुला चे तज्ञ संचालक डॉ.श्री साहेबरावजी राठोड अध्यक्ष प्रा.श्री दिनेश राठोड उपाध्यक्ष प्रा.श्री प्रकाश राठोड सचिव प्रा.श्री मोतीलाल राठोड, कोषाध्यक्ष श्री नाना राठोड तसेच तज्ञ संचालक श्री सुरेशजी जाधव, श्री गोरखनाथ राठोड
आदी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. हजारोच्या संख्येत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पुरस्कार दिल्याबद्दल अध्यक्ष प्रा. श्री दिनेश राठोड यांनी धर्मगुरू श्री संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या