सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री भिकन रामदास जाधव(अंधारीकर) यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर निवड!
चाळीसगाव
अंधारी ता. चाळीसगाव येथील रहिवाशी
तसेच वाशी तसेच मुंबई पोलीस दलातून अलीकडेच सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी तसेच बंजारा समाजातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे,बंजारा इतिहास आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक,भारदस्त लेखन,उत्कृष्ठ वक्तृत्व शैली असलेले प्रखड वक्ते,मा.श्री.भिकन रामदास जाधव साहेब यांची "राष्ट्रीय बंजारा राजकीय परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष"पदावर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी निवड करण्यात आली होती संघटनेकडून त्याच्या उत्कृष्ठ कामाची दखल घेऊन काल दिनांक १५/१२/२०२४ रोजी भक्तीधाम धर्मपीठ पोहरादेवी जिल्हा वाशिम या ठिकाणी धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या शिफाराशीवरून प.पू.धर्मगुरू जितेंद्रजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विलासभाऊ राठोड,राष्ट्रीय प्रवक्ता मा.मधुकर भाऊ जाठोत आणि सबंध महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका अध्यक्षाच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्रातील सबंध बंजारा समाजाकडून भिकन भाऊ जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे !
--------------------------------------------
0 टिप्पण्या