महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

आश्रम शाळा देवळी येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी



चाळीसगाव : नानासो उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.तुषार खैरनार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.विनोद देसले यांनी दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले.

          कार्यक्रमात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा जीवनपट शाळेतील शिक्षक श्री.निलेश पाटील तसेच विद्यार्थी बादल पावरा, सागर पावरा, महेश वळवी, पवन बारेला,सीमा पावरा यांनी मांडला. तसेच शाळेत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन व गांधी संस्कार परीक्षा घेण्यात आली.

        कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधिक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. दीपमाला जाधव व कार्यक्रमाचे आभार श्री.ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या