जेसीआय चाळीसगाव सिटी व एलआयसीतर्फे आयोजित सीपीआर मार्गदर्शन संपन्न

 ताणतणावमुक्त जीवन व नियमित व्यायाम हेच औषध - डॉ. सुजित वाघ



जेसीआय चाळीसगाव सिटी व एलआयसीतर्फे आयोजित सीपीआर मार्गदर्शन संपन्न

चाळीसगाव - माणसाने आयुष्यात नियमित व्यायाम केला पाहिजे व ताणतणावमुक्त जीवन जगल्यास माणसाला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागणार नाही. तसेच वाढत्या हृदय विकाराच्या त्रासामुळे प्रत्येकाने दरवर्षी जर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्राथमिक तपासण्या केल्यास आपण हृदय विकार टाळू शकतो. तर हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णास प्राथमिकत: कशा प्रकारे सीपीआर द्यावा, सीपीआर देण्याचे प्रात्यक्षिक करुन त्याचे महत्व डॉ. सुजित वाघ यांनी सीपीआर मार्गदर्शन शिबिरात सांगितले.

जेसीआय चाळीसगाव सिटी व भारतीय आयुर्विमा निगम यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सीपीआर मार्गदर्शन शिबीर दि. 7 मे 2024 बुधवार रोजी चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील भारतीय आयुर्विमा निगमच्या मिटींग हॉलमध्ये संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय आयुर्विमा निगम चाळीसगाव शाखेचे शाखाधिकारी श्री. संजय मोरे, सीए जेसी निलेश गुप्ता, मार्गदर्शक म्हणून डॉ. सुजित वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जेसीआय चाळीसगाव सिटीचे अध्यक्ष जेसी नरेंद्र शिरुडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री. संजय मोरे यांनी उपस्थितांना निरोगी राहण्याबाबत मार्गदर्शन केले तर सीए जेसी निलेश गुप्ता यांनी जेसीआय या जागतिक संस्थेबाबत सर्वांना माहिती दिली.

कार्यक्रमास एलआयसी एजंट अजय पाटील, प्रशासनीक अधिकारी योगेश तायडे, विजय पाटील, राजेश गवारे, अनिल गोत्रे, स्मिता मांडे, प्राजक्ता जगताप, सुप्रिया गायकवाड, प्रकल्प प्रमुख जेसी मंगेश जोशी, जेसी संजय पवार, जेसी निरज येवले, जेसी आतीश कदम, जेसी महेंद्र कुमावत, जेसी मयूर अमृतकार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेसी चंद्रकात ठाकरे यांनी केले तर आभार सचिव जेसी मनोज पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, महेश चौधरी, कैलास गोयर व सर्व जेसीआय सदस्य, एलआयसी ऑफीस मधील कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या