मै बंजारा , मोदी हमारा चा नारा देत राष्ट्रीय बंजारा परिषदेचा भाजपास् जाहीर पाठींबा


 गोवा लोकसभा मतदार संघात "मैं बंजारा, मोदी हमारा" असा नारा देत दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधील चार लाखाहून अधिक बंजारा मतदारांना भाजपा महाविजय 2024 मध्ये सहभागी करून राष्ट्रीय बंजारा परिषदेचा जाहीर पाठींबा. 


 गोवाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये साऊथ गोवा लोकसभा उमेदवार सौ.पल्लवीताई डेंपो यांना राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय महासचिव तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.पंडितभाऊ राठोड यांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेचा जाहीर पाठिंबा दिला 

साऊथ गोवा येथे आयोजित जाहीर सभामध्ये गोवाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत साहेब यांना राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय महासचिव भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.पंडीतभाऊ राठोड यांनी समाज प्रमुख, पदाधिकारी सह भेटून साऊथ गोवा भाजपचे लोकसभा उमेदवार सौ.पल्लवी श्रीनिवास डेंपो यांना जाहीर पाठिंबा देऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये गोरबोली भाषेला मान्यता यासाठी प्रयत्न करणे व गोव्यामध्ये असलेल्या कार्यकर्ते यांना राजकीय स्थान दयावं तसेंच गोव्यामध्ये व्यवसायानिमित्त असलेल्या समाज बांधवाना राजकीय  पाठबळ देऊन त्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन सोडवणे, युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावे आसे अनेक मुद्यांवर चर्चा करून अँड. पंडीत भाऊंनी जाहीर सभेत बोलताना बंजारा समाजाची मोठी ताकत गोवा मध्ये आसून बंजारा समाज बांधवांचे समाजाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे असे जाहीर पाठिंबा देताना सांगितले. यानुसार गोवा बंजारांमध्ये अत्यंत आनंद व उत्साहाचे वातावरण असून पंडीत भाऊंच्या दौऱ्यामध्ये गोव्यातील बंजारा भाजपा मय झाला आहे.

मैं बंजारा मोदी हमारा.. अब की बार फिर से मोदी सरकार..अब की बार 400 पार हा नारा देऊन गोवा राज्यात दौरा करून भाजपला विजय मिळवून देण्यासाठी पंडीत भाऊनी ताकतीने बंजारा समाजाला एकजुट करून भाजपचे दोन्ही उमेदवार विजय निश्चित केले आहे.

केंद्रीय मंत्री मा.श्रीपाद नायक,गोवाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत साहेब, भाजपचे लोकसभा उमेदवार सौ.पल्लवी श्रीनिवास डेंपो,भाजपा प्रदेश अध्यक्ष व राज्यसभा सदस्य मा.सदानंद तनावडे , स्थानिक आमदार मा. संकल्पा आमोणकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.राकेश अग्रवाल यांनी भाऊंचे स्वागत करून आभार मानले आहे.

 यावेळी महंत लक्ष्मण महाराज ( हमुगड ,अथणी ), राष्ट्रीय बंजारा परिषदचे कार्याध्यक्ष मा.अनिल नाईक, प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रेमकीसन राठोड, प्रदेश प्रवक्ते मा.अमोल पवार, यांच्या सह गोवा प्रदेश अध्यक्ष मा.सुरेश राजपूत, सौ.कोमल राठोड, शिवाजी चव्हाण, गोविंद राठोड, प्रकाश राठोड, आनंद लमाणी, दीपक लमाणी, ईश्वर चव्हाण, चंदू पवार, सचिन राठोड, राजू नायक, रामली चव्हाण, ईश्वर चव्हाण, मा.किरण राठोड, मा.सचिन राठोड, मा.सुनील राठोड, फुलसंग राठोड यांच्यासह गोव्यातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या