भटके विमुक्त सामाजिक संस्था व अंबरनाथ वाहतुक शाखेचा स्तुत्य उपक्रम
सामाजिक जबाबदारी म्हणून आदिवासी माता भगीनींसोबत दिवाळी साजरी
प्रतिनिधी : अंबरनाथ
भारतीय समाजजीवन हे उदार मनाचे आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे, कुठलेही सण सामुहिकरित्या साजरे करण्याची परंपरा तशी जुनीच , परंतु झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे गाव व वाड्या झाकल्या गेल्या हे मात्र खरे. सदैव समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणारे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यानी आदिवासी वाडीवर दिवाळी उत्सव अशी संकल्पना वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यानां बोलुन दाखवली असता कार्यक्रमाचे आयोजन करून दिवाळी साजरी करण्याचे ठरविण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक संस्था कार्य करीत अाहेत त्यापैकी अंबरनाथ येथील भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे उपक्रम आगळे वेगळे असतात, याची प्रचिती नुकतीच अंबरनाथ मधील आंबेवाडी या आदिवासी पाड्यात दिवाळी फराळ व माता भगिनिंना साडी वाटप या कार्यक्रमाने आली. सदर कार्यक्रमाला अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. आंबेवाडी एक आदिवासी भाग असून तिथे अनेक गरजू महिला व बालके आहेत. आंबेवाडी मध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे हे परीसरातील नागरीकांच्या सांगण्यावरून लक्षात येत होते. सदर कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आदिवासी मुलांना व माताभगिनिंना प्रबोधन करताना आदिवासी बांधव व माताभगीनी तसेच मुले दूर्लक्षित घटक आहेत, खुप काही त्यांच्या उन्नतीसाठी करण्यात येतं परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही परंतु त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्नशिल असणारे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी अशी सकल्पना मांडली व आम्ही सगळे या उपक्रमात सहभागी झालो, दुर्लक्षित समाजातील सर्वसामान्य लोकांसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मीळाली त्यात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे, आदिवासी समाजातील दूर्लक्षित घटकासाठी सुरू असलेले सुंदर डांगे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले, याच समाजातील मुले उद्या उच्च शिक्षण घेऊन शहराचे नाव मोठे करतील त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी अशा दूर्लक्षित घटकाकडे लक्ष देण्याची गरज आहे व आपण सर्वानी मिळून डांगे साहेबानां सहकार्य केल्यास या लोकांचे जिवनमान उंचावण्यात व या वाडीचे कायापालट होऊन एक आदर्श वाडी निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन अंबरनाथ शहराचे ब्रँड अम्बासेडर सलील जवेरी यांनी केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. सुंदर डांगे यांनी एका वर्षात कायापालट केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संशोधक अभ्यासक प्रा. धनराज दशरथ डांगे यांनी देखील आदिवासी महिलांना त्यांच्या भविष्याची किल्ली त्यांची मुले असून त्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे व काही समस्या असल्यास जरुर मार्गदर्शन घ्यावे असा सल्ला दिला, त्यास भटके विमुक्त संस्थांची साथ असेल अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, अंबरनाथ शहराचे ब्रँड अम्बेसेडर सलील जव्हेरी , प्राध्यापक धनराज डांगे सर, पोलीस उपनिरीक्षक बाळू लबडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटोळे, पोलीस नाईक गणेश जाधव, पोलीस शिपाई सलमान तडवी, महिला पोलीस शिपाई शोभा कणसे, महिला पोलीस शिपाई सोनाली माळी, वाहतूक मदतनीस सुशीलराव पोटघन, बाळाराम राणे,पप्पु अभंगे , संगीता पतंगे, प्रमोद गायकवाड, हर्षद पठाडे समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.अशी माहीती संस्थेचे सचिव मनी डांगे यांनी दिली

0 टिप्पण्या