तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय चाळिसगांव!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
आज 'तहसील कार्यालय चाळिसगांव' येथे माननीय तहसीलदार साहेब श्री प्रशांत पाटील सर यांनी तालुक्यातील सर्व अधिकृत सी एस सी धारक व्हि एल ई व महा ऑनलाईन सेवा केन्द्र चालक यांची मिटीग घेऊन सध्या परिस्थीवर अमलबजावणी आणि शासकीय योजनांबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
तालुक्यातील केंद्र चालकांच्या अडचनी समजून घेतल्या व त्यावर रितसर सखोल मार्गदर्शन हि केले.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही गोष्ठी पुराव्यानीशी निदर्शनांस आणून दिल्यास संबंधीतांवर योग्य ती कारवाई करण्याची हमी ही दिली!
सध्या च्या धरतीवर सुरू करण्यात आलेली *मुख्यमंत्री 'लाडकी बहीन'* योजनांबद्दल योग्य व परिपूर्ण माहिती दिली, या योजनांची फक्त घोषणा करून जि आर निर्गमीत करण्यात आलेला आहे, अजून तरी कुठेही फाॅर्म भरण्याची सुरूवात शासनाने केलेली नाही, सध्या काही केंद्र चालक एक लाडकी बहिन योजनांचा फॉर्म भरुन घेत आहेत व अव्वाच्या सव्वा पैसे महिलांकडून लाटत आहेत, असे पैसे देऊ नयेत फॉर्म व कागदपत्रे जमा करुन घेणारे व आगावू जास्त पैसे घेणार्या सिएससी धारक व महा ऑनलाइन केंद्र चालकांना विरूद्ध शासकीय कारवाई करण्याची तयारी दर्शवली चूकिचे प्रकार करुन पैसे घेऊ नयेत असे सूचित केले सध्या लाडकी बहीन योजनांचा फॉर्म हा शासकीय फॉर्म नाहीय त्यावर आळा घालण्यात येणार आहे लाडकि बहीन योजनेचा असा कुठलाही फॉर्म महिलांनी भरुन देऊ नये व केंद्र चालकांनी पैशांसाठी महिलांची दिशाभुल करू नये असे फॉर्म भरुन घेणार्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची दक्षता सर्व केन्द्र चालक यांनी घेण्याची सुचनाही केली तसेच लाडकी बहीन योजनांची काही अटि शर्थी जसे कि उत्पन्न दाखला, शाळेचा दाखला अधिवास दाखला, ५ एकर पेक्षा जास्त शेती वैगैरे नियम शिथील करण्यात आले असुन उत्पन्न दाखला ऐवजी पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक, अधिवास दाखला ऐवजी मतदान कार्ड व वयाची अट वाढवून ६५ वर्ष केली असल्याचे ही सांगीतले!
आपत्ती व्यवस्थापन ई-केवाईसी युद्ध पातळीवर पुर्ण करुन प्रत्येक शेतकरी पर्यंत हा लाभ पोहचला पाहिजे या साठी मा. तहसिलदार साहेब आत्मीयतेने व उदात्त हेतून शेतकरी परिवारास लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगीतले!
सोबतच केंद्र चालकांना उद्भवणार्या अडचनींवर केंद्र चालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला व सखोल मार्गदर्शन ही केले व काही आवश्यक मागनींचे केंद्र चालकांकडून रितसर निवेदन आल्यास त्यावर योग्य ते सहकार्य करण्यात येईल याची शाश्वतीही माननीय तहसीलदार साहेब श्री प्रशांत पाटील सर यांनी दिली!
सोबतच अनेक तहसिल विभाग पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते!

0 टिप्पण्या