बुद्धविहार समिती च्या अध्यक्षपदी धर्मभुषण बागुल यांची एकमताने निवड

 तथागत बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित बौद्ध समाज मेळावा संपन्न.



बुद्धविहार समिती च्या अध्यक्षपदी

 धर्मभुषण बागुल यांची एकमताने निवड



4 ठराव एकमताने मंजूर


  चाळीसगाव :  बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने चाळीसगांव तालुका बौद्ध पंचायत ने आयोजित केलेला मेळावा 23 मे रोजी संपन्न झाला.या मेळाव्यास रणरणत्या उन्हात देखील तालुक्यातील समाज बांधव प्रचंड संख्येने उपस्थित होते.

पंचायत चे विद्यमान अध्यक्ष मा. आण्णासाहेब साहेबरावजी घोडे माजी आमदार हे होते. सरचिटणीस मा.धर्मभुषण बागुल यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष मा.गौतम झाल्टे , उपाध्यक्ष रामचंद्र जाधव ,कोषाध्यक्ष महेश चव्हाण यांचे सह संचालक ऍड.राहुल जाधव, सुधाकर मोरे, रवींद्र निकम, किरण जाधव, सुरेश पगारे हे कार्यक्रमास उपस्थित होते.

       ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.मेळावा संपन्न होई पर्यंत समाज बांधवांचे येणे चालू होते.

      मेळावा वेळेवर सुरू करण्यात आला.अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.संचालक रवींद्र निकम यांनी सूत्र संचालन करतांना तथागत बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या त्यागावर आधारित सुमधुर व तितकेच अर्थपूर्ण गीत सादर केले.

       यानंतर धर्मभुषण बागुल यांनी मेळाव्याचे आयोजना बाबतची भूमिका सविस्तरपणे समजावून सांगितली.

     त्यानंतर विषयानुरूप चर्चा करण्यात आली.त्यात समाजाचे सुसंघटन करणे , समाजाचे सर्वेक्षण करून सदस्य नोंदणी करणे. तालुक्यात राज्यस्तरीय भव्य बुद्धविहार निर्माण करणे.या बुद्धविहार निर्माण कार्यासाठी समिती ची स्थापना करणे आदी विषयांवर उपस्थित समुदायाने सांगोपांग चर्चा केली. व एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

     याप्रसंगी पंचायत चे अध्यक्ष मा.घोडे साहेबांनी बुद्ध विहार समितीच्या अध्यक्षपदी धर्मभुषण बागुल यांच्या नावाची घोषणा केली. संचालक मंडळाने व सर्व उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडाडात त्यास मंजुरी दिली.

     या समितीत काम करु इच्छिणाऱ्या लोकांची नावे देण्याचे आवाहन केले असता 156 लोकांनी आपली नावे दिली आहेत.

     माजी आमदार घोडे साहबांचे अध्यक्षीय मनोगत झाल्या नंतर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संचालक सुधाकर मोरे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपन्न झाला.

   या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी महेंद्र जाधव , मुकेश नेतकर , बाजीराव घोडे ,मनोज जाधव , बाबा पगारे ,विशाल पगारे, मयूर बागुल , सुमित सोनवणे गोपाल भालेराव , आकाश मोरे, धनंजय अहिरे अवधेश बागुल ,सागर निकम धम्मपाल अहिरे , रामा मोरे , महेंद्र निकम , राजू अहिरे , सदाशिव कदम , अजय जाधव ,घनशाम बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या