चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिवपदी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर

 चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिवपदी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर



शिक्षक प्रतिनिधीपदी उपप्राचार्य डॉ. अजय काटेः

चाळीसगावःचाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मंजूर घटनेतील तरतुदीनुसार गुरुवारी सायंकाळी व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या उपस्थित झालेल्या सभेत सहसचिवपदी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर तर शिक्षक प्रतिनिधीपदी उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या सभेत प्राचार्य डॉ. बिल्दीकर व उपप्राचार्य डॉ. काटे  यांच्या निवडीची सुचना चाळीसगाव महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वार यांनी मांडली. अनुमोदन एच. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे चेअरमन अशोक बागड यांनी दिले. यावेळी व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, संस्था उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, आ.बं. मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन अॕड. प्रदीप अहिराराव, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन शामलाल कुमावत, व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे चेअरमन जितेंद्र वाणी, शंकर बारकु इंग्लिश मिडियम स्कुलचे चेअरमन नीलेश छोरिया, ज्येष्ठ संचालक मु. रा. अमृतकार, क्रिडा समितीचे चेअरमन योगेश करनकाळ, संचालक रवींद्र राजपूत, मुख्याध्यापक के. एन. तडवी, सुलोचना इंगळे, मंजूषा नानकर, सुनिल पाटील, प्रमोद दायमा, शबनम शेख आदि उपस्थित होते. कळंत्री प्राथ. विद्यालयाचे चेअरमन भोजराज पुंन्शी, बा.बा.सोनवणे, मिलिंद देव, रमेश रोकडे यांनी अभिनंदन केले. 


निवडीनंतर सत्कार

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीला शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असून नुतन सहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांना शिक्षण क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव आहे. नुकताच त्यांचा उमवितर्फे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देऊन गौरव झाला आहे. अमळनेरस्थित संत सखाराम महाराज भक्त परिवारातही ते काम करतात. नारायणदास अग्रवाल यांनी प्राचार्य बिल्दीकर यांची निवड केल्याने ब्राम्हण समाजालाही यामुळे न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गत ६० वर्षापासून व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी संस्थेच्या हिताची जपणूक करतांना गुणवत्तेला प्रथम स्थान दिले आहे. यासोबतच सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांनी न्याय देखील दिला आहे. सहसचिवपदावर काम करतांना आपण याविचारानेच काम करु. अशी ग्वाही यावेळी प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी दिली. नूतन पदाधिका-यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या