महिला स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा ,

 महिलांसाठी स्वच्छतागृह उभारा अन्यथा आक्रमक आंदोलन ; मनसेचा चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाला इशारा 



आठ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो. मात्र महिलांसाठी चाळीसगाव शहरात स्वच्छतागृह नाही यासारखी कोणती खंत नाही चाळीसगाव शहरात तालुक्यातील विविध गावातून महिला शासकीय निम शासकीय कामांसाठी तसेच संसारी वस्तू खरेदीसाठी चाळीसगाव शहरात येत असतात मात्र चाळीसगाव शहरात महिलांसाठी स्वतंत्र असे स्वच्छतागृह नाही त्यामुळे महिलांची अनेकदा कुचंबना होते...

शहरात अनेक मोठमोठे कॉम्प्लेक्स आहे मात्र त्यांची स्वच्छतागृहे अस्वच्छ , निकामी आहेत अशा ठिकाणी महिलांना जाण्यासाठी किळस येते त्यामुळे महिलांना शहरातील कॉम्प्लेक्स मधल्या स्वच्छतागृहाचा वापर करता येत नाही, चाळीसगाव नगरपालिका प्रशासन कर जमा करण्यात जर अव्वल स्थानी आहे तर सुविधा देण्याच्या नावाने नगरपालिकेची बोंबाबोंब का असते? अनेक सुविधांच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाची बोंबाबोंब आहे. नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा बाबत देखील क्रमांक 1ला आहे, निदान 

त्यांनी महिलांची ही बाब लक्षात घेऊन चाळीसगाव शहरात व्यापारी संकुलनातील शौचालय स्वच्छ व वापरण्यायोग्य करावे तसेच शहरात विविध प्रभागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणी करून त्याची देखभाल करावी, यासाठी चाळीसगाव मनसे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जर याबाबतीत नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करून चाळीसगाव शहरातील नगरपालिका प्रशासनाला आणि मनसे स्टाईल उत्तर देऊ असे चाळीसगाव मनसेच्या वतीने सांगण्यात आले मनसे स्टाईलने उत्तर देताना काही कमी जास्त झाल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.. 

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील मनसे शहराध्यक्ष शैलेश मोरे मनसे महिला सेना सुषमा सुळे.पायल हंडे. मनसे तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील.दिलीप शेर .उपशहरप्रमुख विजय चव्हाण. गोविंद सावळे.मनसे शहर संघटक आकाश सोनवणे.वाल्मिक मोरे गोपाल पवार.महेश गोयर.राहुल चव्हाण.सपत राठोड.देविदास राठोड. आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या