मराठा महासंघाच्या तालुका अध्यक्ष निळकंठ पाटील तर शहराध्यक्षपदी नंदकिशोर पाटील यांची निवड
चाळीसगाव वार्ताहार :अखिल भारतीय मराठा महासंघाची पाचोरा येथील शासकीय विश्राम गृह येथे 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी एडवोकेट निळकंठ पाटील तर चाळीसगाव शहराध्यक्षपदी नंदकिशोर पाटील यांची निवड करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोर्यातील शासकीय विश्रामगृह येथे मराठा महासंघाचे अधिवेशन व नवीन पदाधिकारी निवड याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ.बी बी.भोसले व जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठा महासंघाच्या 7 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी एडवोकेट निलकंठ पाटील चाळीसगाव शहराध्यक्षपदी नंदकिशोर पाटील यांची निवड जिल्हाध्यक्ष डॉ. बीबी भोसले यांनी केली. तसेच त्यांना लागलीच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडेपाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे,एरंडोल तालुका अध्यक्ष महेश पाटील, अमलनेर तालुकाध्यक्ष उमेश पाटील, उपस्थित होते. सर्व मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एडवोकेट निलकंठ पाटील, नंदकिशोर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या निवडीमुळे दोघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 टिप्पण्या