वडाळे वडाळी गावाला एस टी सुरु करा - आगार व्यवस्थापकांकडे रयत सेनेची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी - तालुक्यातील वडाळे वडाळी गावाला गेल्या ९ दिवसांपासून एस टी ची सुविधा चाळीसगाव आगारा मार्फत बंद करण्यात आल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तात्काळ वडाळे वडाळी गावासाठी एस टी ची सुविधा सुरू करण्याची मागणी चाळीसगाव आगार व्यवस्थापक यांच्याकडे रयत सेना व विद्यार्थ्यांनी दि २९ रोजी निवेदनाद्वारे केली आहे,
वडाळे वडाळी गावाला सुरू असलेली एस टी बंद करून गावाला शासनाच्या सुविधेपासून वंचित ठेवत असल्यामुळे चाळीसगाव आगाराच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे. रेल्वे विभागाने गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले रेल्वे गेट १२३ बंद करून रेल्वे खालून नवीन बोगदा तयार करून बोगद्यातून एस टी सुरळीतपणे गावाकडे जात असल्याचे आगार व्यवस्थापकांसमोर दाखविल्यानंतर एस टी गावाकडे जाऊ शकते असा ग्रिन सिग्नल दिल्यामुळे वडाळे वडाळी गावाकडे जाण्यासाठी असणारे रेल्वे गेट १२३ रेल्वे विभागाने बंद केले आणि काही दिवसांनंतर बोगद्यातून एस टी जाऊ शकत नाही असे कारण देवून चाळीसगाव एस टी आगाराने गावाची फसवणूक केली आहे. चाळीसगाव आगारा मार्फत एस टी ची सेवा व सुविधा बंद केल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आपल्या चुकीचे निर्णयामुळे होत आहे, चाळीसगाव आगारा मार्फत एस टी ची सेवा व सुविधा तात्काळ सुरू करावी अन्यथा वडाळे वडाळी गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांसह रयत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करत चाळीसगाव आगाराचे प्रवेशद्वार बंद करण्यात येइल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आगार व्यवस्थापक जबाबदार राहणार असल्याचे रयत सेनेच्या वतीने दि २९ रोजी आगार व्यवस्थापक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे, निवेदनाच्या प्रत आमदार, चाळीसगाव,तहसीलदार, चाळीसगाव,शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव,गट विकास अधिकारी ,पंचायत समिती चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत, निवेदनावर
ग्रामपंचायत सदस्य विकास आमले, ग्रा पं सदस्य रविंद्र आमले, ग्रा पं सदस्य बापु आमले, ग्रा प सदस्य शिवाजी आमले, ग्रा प सदस्य शरद अहिरराव, ग्रा प सदस्य चेतन अहिरराव तर रयत शेतकरी सेनेचे जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पाटील,तालुका उपाध्यक्ष भरत नवले,मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या