श्री. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या कोकण संयोजक पदी निवड

 दाभा येथिल ज्ञानेश्र्वर चव्हाण यांची कोकण विभाग संयोजक पदी निवड.नुकत्याच भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारणी जाहीर झाली असून भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब व भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष मा.राहूल जी केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांची कोकण विभाग संयोजक पदी निवड करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पदापासून सुरवात केली असून पुढें तालुका, जिल्हा , प्रदेश पातळीवरील सामाजिक , राजकिय काम करत आहेत. शेतकरी वर्ग, विद्यार्थी वर्ग, 

बंजारा समाज, भटके विमुक्त, ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासठी ज्ञानेश्वर चव्हाण हे नेहमी शासन दरबारी प्रयत्न करत असतात. 


ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या समजिक संघटनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले असून त्यांना अनेक वर्षापासून समाजसेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे . 


पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील प्रत्येक तांडा, वाडी वस्ती, पालापर्यंत संघटन वाडी साठी प्रयत्न करणार असून भटके विमुक्त तसेच सर्व समाजातील प्रश्नांना वाचा फोडीन व पक्षाच्या माध्यमातून न्याय हक्क अधिकार मिळवुण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ज्ञानेश्र्वर चव्हाण यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या