कृषी दिन, वसंतराव नाईक साहेब जयंती निम्मिताने शेतकऱ्यांना तूर बियाणे वाटप

चैतन्य तांडा ग्राम पंचायत ला कृषी दिन व स्व वसंतराव नाईक साहेब जयंती निर्मिताने मोफत तूर बियाणे शेतकर्यांना वाटप



आज१ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील शेतीची जाण असणारे माजी मुख्यमंत्री व शेतीसाठी विविध योजना फल द्रुप करणारे, हरितक्रांतीचे जनक, स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून चैतन्यतांडा नं४ येथील चैतन्य शेतकरी गटास तूर या पिकाचे बियाणे मोफत नामांकित बियाणे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

     आधुनिक युगात शेतकरी जगावा, टिकावा तो आत्मनिर्भर बनावा या प्रमुख उद्देशाने नामांकित तुरीचे बियाणे वाटप करून तुरीचे फायदे व महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. तूर हे शेतकऱ्याचे मुख्य पीक असून त्यापासून चांगले उत्पन्न म्हणजेच हमीचा पैसा मिळू शकतो . तुर हा आपल्या अन्न घटकातील महत्त्वाचा प्रोटीन युक्त भाग, आपल्या जेवणातील अविभाज्य घटक पदार्थ ,तुरीला बाजारात चांगली मागणी असते. म्हणून तुरीचे उत्पन्न वाढावे. हा प्रमुख उद्देश डोळ्यापुढे ठेवून मोफत बियाणे वाटपाचा हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला.व वुक्ष रोपण ग्राम पंचायत परीषरात वूक्ष करण्यात आले कृषी सहायक जाधव प्रज्ञा,ग्रामसेवक तान्हाजी भोसले,सरपंच अनिता राठोड,उपसरपंच आनंदा राठोड,पोलीस पाटील लखन राठोड,वसंत राठोड,सुपडू राठोड,साईनाथ राठोड,कैलास राठोड,खिमा भाऊ,काळू पवार,जोरसिंग तवर,संतोष पवार,धर्मा जाधव,भावलाल चव्हाण,इंदल राठोड,अर्जुन राठोड साईलाल,दिलीप राठोड , दिनकर राठोड यांनी सगळ्यांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या