अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड

 विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड 



पुणे प्रतिनिधी : योगेश आल्हाट

पिंपरी चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा प्रस्ताव मांडला व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी अजित पवार समर्थक असलेले अण्णा बनसोडे यांचे नाव फायनल झाले. लातूरचे संजय बनसोडे आणि गोंदियाचे राजकुमार बडोले यांची नावे चर्चेत होती.परंतु 2009 पासून आमदार असलेले अण्णा बनसोडे 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग निवडून आले आहेत. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सर्व शहरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या