चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे अनोखे उपक्रम; अंगणवाडीस व जि प शाळेला साहित्य वाटप

 चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे अनोखे उपक्रम; अंगणवाडीस व जि प शाळेला साहित्य वाटप



 चाळीसगाव प्रतिनिधी 

 विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असणाऱ्या चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने अंगणवाडी व जि.शाळे साठी विशेष उपक्रम राबविले आहे. या उपक्रमांतर्गत दहा टक्के निधी खर्चून मोफत साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून महिला बालकल्याणाचे दहा टक्के रक्कम खर्चून अंगणवाडीस मोफत साहित्य व जि.प.शाळेला आज सकाळी ८:३० वा वाटप करण्यात आले. सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यात कढई, कुकर, पिम्पमोठा व सतरंगी चटई आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागास देखील खुर्च्या, फॉन, टुब लाईट,यासह विविध साहित्य वाटप करण्यात येत आहे. 

तत्पूर्वी या अभिनव उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचे कौतुक होत असून गेल्या पाच वर्षांपासून सदर ग्रामपंचायतीने यशस्वी वाटचाल केली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातून त्या अग्रेसर राहिल्या आहे. 


याप्रसंगी विकासो माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य वसंत राठोड, भाऊलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण,साईनाथ राठोड, संदीप पवार शाळेचा मुख्याध्यापक रवींद्र बेलदार सर व पदम तवर, जालम बाबा, उदल पवार,सुपडू बाबा,इंदल भाऊ,मानसिंग राठोड,गणपत जाधव ,कैलास राठोड, दिनकर राठोड,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या