खुनातील आरोपीचे फुलांची उधळण करत जंगी स्वागत
7 वर्षांनी जामीनावर झाली सुटका
पुणे प्रतिनिधी : योगेश आल्हाट
पिंपरी. खुनातील एक आरोपीची तब्बल सात वर्षांनी जामीनवर सुटका झाली. तो निगडीतील घरी आल्यानंतर, त्याच्या साथीदारांनी फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले आहे. श्याम यतनाळकर (रा. त्रिवेणी नगर, तळवडे, निगडी )असे जामीनवर सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सातारा येथील एका खून प्रकरणात तो आरोपी आहे. तो गेली सात वर्ष तुरुंगात होता. नुकताच त्याला जामीन मंजूर झाल्यावर, तो त्रिवेणी नगर येथील घरी रात्री आठ वाजता आला. तो आल्यानंतर त्याच्या साथीदाराने त्याचे जंगी स्वागत केले. तसेच फटाक्याची आतिषबाजी करून दहशत माजवली.
याबाबतची माहिती मिळताच निगडी पोलीस त्याच्या घरी गेले. मात्र जंगी स्वागतानंतर कोणते नवीन संकट यायला नको. म्हणून आरोपींनी तिथून पळ काढला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधून, त्याला निगडी पोलीस ठाण्यात येण्याबाबत समज दिली आहे. तसेच स्वागतासाठी कोण कोण होते याचीही पोलीस चौकशी करत आहे.
0 टिप्पण्या